Corona: कोरोना चाचण्या वाढवा! केंद्रीय आरोग्य सचिवांचे महाराष्ट्रासह १३ राज्यांना पत्र

Union Health Secretary Rajesh Bhushan writes to Maharashtra and 13 state over a decline in weekly COVID 19 testing rates
Corona: कोरोना चाचण्या वाढवा! केंद्रीय आरोग्य सचिवांचे महाराष्ट्रासह १३ राज्यांना पत्र

देशभरात जरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी काही राज्यांमध्ये अजूनही चिंतेचे वातावरण आहे. त्या राज्यांमध्ये कोरोना केसेसे प्रमाण आणि मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान आता केंद्रीय आरोग्य सचिवांनी महाराष्ट्रासह १३ राज्यांना कोरोना चाचण्या वाढवण्याचे आवाहन पत्र लिहून केले आहे. कारण महाराष्ट्रसह या १३ राज्यांमध्ये कोरोना चाचण्याचे साप्ताहिक दरांमध्ये घट झाली आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र, नागालँड, सिक्कीम, केरळ, गोवा, मणिपूर, मेघालय, मिझोराम, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि लडाख या राज्यांना कोरोना चाचण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी सांगितले आहे. पत्रामध्ये राजेश भूषण यांनी इतर देश कशाप्रकारे कोरोनाच्या चौथ्या आणि पाचव्या लाटेचा सामना करत आहेत, याचे उदाहरण दिले आहे. तसेच हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहे. त्यामुळे यादरम्यान कोरोनाचा प्रसार वाढवू नये, यासाठी राजेश भूषण यांनी महाराष्ट्रासह १३ राज्यांना कोरोना चाचण्या वाढवण्याचे आवाहन केले आहे.

देशात कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहेत. मात्र महाराष्ट्रासह १३ राज्यांमध्ये कोरोना चाचण्याचे प्रमाण विशेष काही वाढताना दिसत नाही. सध्या सणासुदीचे आणि विवाह समारंभाचे दिवस लक्षात घेता महाराष्ट्रासह १३ राज्यांमध्ये कोरोना चाचण्यावर भर देण्याचा सल्ला राजेश भूषण यांनी दिला आहे. दरम्यान देशात गेल्या २४ तासांत ९ हजार २८३ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ४३७ जणांच्या मृत्यू नोंद झाली आहे. तर १० हजार ९४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या देशात १ लाख १८ हजार ४८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.