Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Covid-19 Update: कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही; केंद्रीय मंत्रालयाचा इशारा!

Covid-19 Update: कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही; केंद्रीय मंत्रालयाचा इशारा!

Related Story

- Advertisement -

देशात सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जात आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी खबरदारीच्य़ा उपाययोजना सुरु केल्या आहेत. तर गणेशोत्सव आणि आगामी सणांवरही निर्बंध लावले जात आहे. पण अद्याप कोरोनाची दुसरी लाटं पूर्णपणे ओसरली नाही असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. देशात कोरोनाच्या रुग्णसंख्य़ेत ५० टक्क्यांपेक्षा घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. यात एकट्या केरळमध्ये ६८ टक्के बाधितांची संख्या आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या माहितीनुसार, “देशात गेल्या २४ तासांत ४३,२६३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यात एकट्या केरळमधील संख्या ३२ हजारांहून अधिक रुग्ण असल्याचे आढळून आले आहे. तर संपूर्ण देशातील ३८ जिल्ह्यांमध्ये प्रतिदिन १०० हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येतील ६१ टक्के रुग्ण केरळमध्ये तर १३ टक्के महाराष्ट्रात आहेत. कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशात १० हजारहून अधिक आणि ५० हजारांहून कमी सक्रिय रुग्ण आहेत.”

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य सचिवांनी म्हणाले की, “सणासुदीच्या दिवसांत वाढत्या रुग्णसंख्येमुळे लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे आहे. देशात आत्तापर्यंत ७२ कोटी नागरिकांना लस देण्यात आली. यात मे महिन्यात प्रतिदिन सरासरी २० लाख नागरिकांना लस देण्यात आली. तर सप्टेंबर महिन्यात प्रतिदिन सरासरी ७८ नागरिकांना लस देण्यात आली.”

देशात वेगाना सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेवर नीति आयोगाचे डॉ. वीके पॉल म्हणाले की, “देशात १८ वर्षावरील ५८ टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस देणयात आला आहे. तर यातील १८ टक्के नागरिकांनी लसीचा दुसरा डोस देखील पूर्ण झाला आहे. मात्र आता १८ वर्षाखालील लहान मुलांच्या लसीकरणासाठी प्रयत्न करत आहोत. लहान मुलांच्या लसीकरणासाठी एक लस उपलब्ध झाली आहे. मात्र मुलांच्या शाळा उघडण्यासाठी त्यांचे लसीकरण करणं गरजेचे असल्याचा निकष जगात कुठेही पाहायला मिळाला नाही.”


Ganeshotsav 2021 : गणेश चतुर्थीला ‘या’ सोप्प्या मनमोहक, आकर्षक रांगोळ्यांनी करा बाप्पाचं स्वागत


- Advertisement -

 

- Advertisement -