अमित शाहांकडून राज्यांच्या गृहमंत्र्यांचे चिंतन शिबिर; ममतांनाही पाठवले निमंत्रण

केंद्रीय गृह मंत्रालयाने 27-28 ऑक्टोबर रोजी सुरजकुंड, हरियाणा येथे सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांची चिंतनशिविर बोलावली आहे. यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांना आमंत्रित केले आहे. या बैठकीसाठी अमित शाहा यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने 27-28 ऑक्टोबर रोजी सुरजकुंड, हरियाणा येथे सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांची चिंतनशिविर बोलावली आहे. यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांना आमंत्रित केले आहे. या बैठकीसाठी अमित शाहा यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. याबाबत एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. मात्र अमित शाहांच्या या गृहमंत्र्यांचे चिंतन शिविराला ममता बॅनर्जी जाणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

देशातील अंतर्गत सुरक्षेशी संबंधित समस्या आणि समस्यांवर चर्चा करण्यासाठी गृह मंत्रालय दोन दिवसीय ‘चिंतन शिविर’ आयोजित करणार आहे. त्यासाठी सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांना निमंत्रणे पाठवली जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या चिंतन शिबिरातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा अंतर्गत सुरक्षेचा असणार आहे. तसेच, अंतर्गत सुरक्षेसोबतच राज्याचे पोलिसिंग, नागरी संरक्षण, अग्निशमन आणि होमगार्ड या विषयांवरही चर्चा होणार आहे. शिवाय, अंतर्गत सुरक्षेशी संबंधित काही समस्या आहेत, ज्या परस्पर समन्वय आणि राज्यांच्या मदतीच्या आधारे दूर केल्या जाऊ शकतात, असे गृह मंत्रालयाचे मत आहे.

या शिबिरात राज्यांच्या गृहमंत्र्यांसह गृहसचिव आणि पोलीस महासंचालकही सहभागी होणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या शिबिरासाठी वेगवेगळ्या सत्रांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होणार आहे. गृहमंत्री शाह हे दोन्ही दिवस हरियाणातील सूरजकुंडमध्ये राहणार आहेत.


हेही वाचा – काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोमवारी सहाव्यांदा निवडणूक; घराण्याबाहेरील उमेदवारांमध्ये लढत