काळे कपडे घालून विरोध करण्याचं कारण काय, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची टीका

Union Home Minister Amit Shah

देशभरात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या महागाईने उच्चांक गाठला आहे. सततच्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आज महागाई आणि बेरोजगारीविरोधात देशव्यापी आंदोलन केले. महाराष्ट्रातही काँग्रेसचं आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी काँग्रेसच्या अनेक आमदार आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान, काळे कपडे घालून विरोध करण्याचं कारण काय?, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केली आहे.

काँग्रेस आंदोलनाच्या माध्यमातून आपला अजेंडा पूर्ण करत आहे. आज ईडीनं रेड टाकली नाही. काहीही झालं नाही, तरीही काँग्रेसनं विरोध केला. आज आंदोलन करण्याचं कारण काय, असं अमित शाह म्हणाले.

या आंदोलनानंतर कॉंग्रेसच्या नेत्यांनी पत्राकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेस नेते नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, भाई जगताप, नसीम खान यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिक स्पष्ट केली. यावेळी पत्रकारांशी बातचित करताना कॉंग्रसेच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजपावर हल्लाबोल केला.

काँग्रेसने काळ्या कपड्यात दिल्लीत विरोध प्रदर्शन केलं. राहुल गांधी, प्रियंका गांधींसह काँग्रेसचे नेते काळे कपडे घालून रस्त्यावर उतरले. काँग्रेसचा हा विरोध पक्षाच्या नेत्यांविरोधात होत असलेल्या एजन्सीजच्या कारवाईवर होता. परंतु, अमित शाह यांनी या विरोध प्रदर्शनाला राम मंदिर निर्माणच्या तारखेशी जोडला, असं शाह म्हणाले.


हेही वाचा : गांधी परिवाराला टार्गेट करण्याचा प्रयत्न, ईडी सरकार आमचा आवाज दाबतेय; नाना पटोलेंचा भाजपला टोला