अमित शाह सौरव गांगुलीची डिनर डिप्लोमसी, दादा भाजपमध्ये जाणार

भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे. केंद्रीय ग्रहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह यांनी शुक्रवारी सौरव गांगुली यांच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला.

भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे. केंद्रीय ग्रहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह यांनी शुक्रवारी सौरव गांगुली यांच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला. अमित शाह आणि सौरव गांगुली यांचा एकत्रित जेवतानाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या व्हायरल फोटोनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांनी जोर धरला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी अमित शाह यांनी सौरभ गांगुली यांच्या कोलकात्यामधील घरी भेट दिली.

पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असणाऱ्या अमित शाह यांनी सौरव गांगुली यांच्या घरी भेट दिली. यावेळी सौरभ गांगुली यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी गांगुली यांचा भाऊही उपस्थित होता. अमित शाह यांनी गांगुली कुटुंबियांसोबत जेवणाचा अस्वाद घेतला. पण अमित शाह यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

‘ते आज संध्याकाळी घरी येणार आहेत. त्यांनी माझे आमंत्रण स्विकारले आहे. आमच्याकडे बोलायला अनेक विषय आहेत. मी त्यांना 2008 पासून ओळखतो. ज्यावेळी मी क्रिकेट खेळत होतो, तेव्हापासून त्यांच्याशी भेट होतेय. तसेच सध्या त्यांच्या मुलासोबतही काम करत आहे. आमचे जुने नाते आहे.’, असं सौरव गांगुली यानी अमित शाहांच्या भेटीनंतर सांगितलं.

सौरभ गांगुली यांचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत देखील चांगले संबंध आहेत.


हेही वाचा – LPG Price hike : घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महागला; सर्वसमान्यांच्या आर्थिक खर्चात वाढ