घरCORONA UPDATEकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोनामुक्त

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोनामुक्त

Subscribe

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून ते कोरोनामुक्त झाल्याची दिलासादायक माहिती समोर येत आहे. याबाबत स्वतः अमित शहा यांनी ट्विटर हँडलवर माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून अमित शहा कोरोनाच्या आजाराने त्रस्त होते. कोरोनाशी लढा देऊन अखेर आज गृहमंत्री अमित शहा कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्यांच्या कोरोनामुक्त झाल्याची पोस्ट एका भाजप नेत्याने व्हायरल केली होती. मात्र ती फेक न्यूज असल्याचे वृत्त नंतर समोर आले. परंतू आता अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असल्याचे अधिकृत वृत्त समोर येत आहे.

- Advertisement -

अमित शहा यांनी उपचार घेत असताना त्यांच्यासोबत असलेल्या डॉक्टर आणि इतर आरोग्य सेवक-सेविकांच्या सहकार्यासाठी त्यांचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्विट करत मेदांता हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना धन्यवाद म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

राष्ट्रध्वजाचा ‘मास्क’ विकणार्‍या Amazon, Flipkart वर कारवाई करा; हिंदू जनजागृती समिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -