घरदेश-विदेशकेंद्रीय गृहमंत्रालयानं राज्यात स्पेशल टीम पाठवावी, किरीट सोमय्यांची मागणी

केंद्रीय गृहमंत्रालयानं राज्यात स्पेशल टीम पाठवावी, किरीट सोमय्यांची मागणी

Subscribe

उद्धव ठाकरेंच्या पोलिसांनी सीसीटीव्ही गायब केले. संजय पांडेंनी माझ्याविरोधात बोगस गुन्हा दाखल केलाय. संजय पांडेंनी सीसीटीव्ही फुटेज गायब केले. राज्यात त्यासाठी स्पेशल टीम पाठवली पाहिजे. परिस्थिती चर्चा आणि चिंताजनक असल्याचंही ते म्हणालेत.

नवी दिल्लीः किरीट सोमय्याला झेड कॅटेगरीची सिक्युरिटी केंद्र सरकारने दिली आहे. झेड कॅटेगरी सिक्युरिटी असतानाही पोलीस स्टेशन परिसरात शिवसैनिकांचे काही गुंड जीव घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही खूप गंभीर बाब असल्याचं सांगत केंद्रीय गृहमंत्रालयानं राज्यात स्पेशल टीम पाठवावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्यांनी केली आहे. भाजपच्या शिष्टमंडळानं दिल्लीत किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली, त्यानंतर किरीट सोमय्या माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

उद्धव ठाकरेंच्या पोलिसांनी सीसीटीव्ही गायब केले. संजय पांडेंनी माझ्याविरोधात बोगस गुन्हा दाखल केलाय. संजय पांडेंनी सीसीटीव्ही फुटेज गायब केले. राज्यात त्यासाठी स्पेशल टीम पाठवली पाहिजे. परिस्थिती चर्चा आणि चिंताजनक असल्याचंही ते म्हणालेत.

- Advertisement -

केंद्र सरकारचे गृह सचिव अजय भल्लांशी आमची सखोल चर्चा झाली. 20 ते 25 मिनिटांच्या चर्चेत त्यांच्या चेहऱ्यावरही चिंता पाहायला मिळत होती. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था टिकवणं घटनेनं राज्य सरकारची जबाबदारी आहे. सामान्य नागरिक, प्रतिनिधींवर ज्या पद्धतीनं हल्ले होतायत, अत्याचार होत आहेत, धमकी दिली जात आहे, जिवंत गाडण्याची भाषा मुख्यमंत्री आणि त्यांचे प्रवक्ते करत आहेत. यासंदर्भात अजूनही तक्रारी इकडे आल्या आहेत, असंही किरीट सोमय्यांनी सांगितलं आहे.


आज आम्ही 7 उदाहरणं गृहमंत्रालयाला दिली आहेत. विषय हा फक्त किरीट सोमय्यांचा नाही, तर नेव्ही ऑफिसरपासून एका झोपडीत राहणाऱ्या व्यक्तीचं मुंडन केलं जातं. नेव्ही ऑफिसरच्या घरी शिवसेनेचे गुंड उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून जातात. मनसुख हिरेनची सुपारी घेऊन उद्धव ठाकरेंचे दोन पोलीस ऑफिसर हत्या करतात. आमदार आणि खासदारांना जिवंत गाडण्याची धमकी दिली जात आहे. किरीट सोमय्याला झेड कॅटेगरीची सिक्युरिटी केंद्र सरकारने दिली आहे. झेड कॅटेगरी सिक्युरिटी असतानाही पोलीस स्टेशन परिसरात शिवसैनिकांचे काही गुंड त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ही खूप गंभीर बाब आहे, असा आरोप करत त्यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय.

- Advertisement -

हेही वाचाः माझा मनसुख हिरेन केला तरी माफिया सेनेचा अंत करणारच, सोमय्यांचा दिल्लीतून ठाकरे सरकारला इशारा

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -