Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर कोरोना पॉझिटिव्ह

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर कोरोना पॉझिटिव्ह

संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करावी - जावडेकर

Related Story

- Advertisement -

देशात कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट पसरली आहे. या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक जलद आहे. आतापर्यंत कोरोनाची लागण सर्वसामान्य नागरिक ते लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांनाही झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. तर आता केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे जावडेकर यांनी ट्विट करुन सांगितले आहे. तसेत त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही कोरोनाची चाचणी करण्यास केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करत सांगितले आहे की, माजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे गेल्या २ ते ३ दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करुन घ्यावी. असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

वाढत्या कोरोना परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकार कडक उपाययोजना करत आहे. देशात आरोग्य व्यवस्था आणि सर्व आरोग्य सेवेतील संसाधनांबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आढावा घेतला होता. कोरोनाची लागण झाल्यानंतर आता जावडेकर व्हीसीद्वारे सर्व बैठका आणि कामकाज पाहणार आहेत.

- Advertisement -

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडीयुरप्पा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान येडियुरप्पा ट्वीट करत लिहिलं आहे की, मला सौम्य ताप होता, ज्यानंतर मी कोरोना चाचणी केली आणि याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. मी आता ठिक आहे, डॉक्टरांच्या सल्लानुसार रुग्णालयात दाखल केलं गेलं आहे. अलीकडेच माझ्या संपर्कात आलेल्यांना विनंती करतो की, सावध राहा आणि स्वतः क्वारंटाईन राहा.

- Advertisement -