घर देश-विदेश INDIA वि. भारत वादाबाबत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले...

INDIA वि. भारत वादाबाबत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – “या अफवा…”

Subscribe

INDIA आणि भारत प्रकरणावर आता केंद्रीय मंत्री अनुगार ठाकूर यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. केंद्र सरकार या विषयावर आपली काही भूमिका असेल तर ते स्पष्ट करेल. असे ठाकूर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

नवी दिल्ली : देशाचे नाव INDIA वरून भारत असे बदलले जाऊ शकते, अशा चर्चांना सध्या उधाण आलं आहे. 18 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात देशाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे यावरून राजकारणही तापले आहे. विरोधी पक्ष सरकारवर निशाणा साधत आहेत, तर सरकारकडूनही प्रत्युत्तर सुरू आहे. राष्ट्रपती भवनात 9 सप्टेंबरला G20 च्या शिखर परिषदेनिमित्त स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेमध्ये President Of INDIA ऐवजी President Of BHARAT असा उल्लेख करण्यात आल्याने आता INDIA आणि भारत या दोन शब्दावरून वाद निर्माण झाला आहे. ( Union Minister Anurag Thakur’s Big Statement on India vs BHARAT Debate)

हेही वाचा – India vs Bharat : भारताने ‘इंडिया’ नाव सोडल्यास पाकिस्तान करणार दावा? ‘या’ ट्वीटमुळे चर्चेला उधाण

- Advertisement -

पण या सगळ्या प्रकरणावर आता केंद्रीय मंत्री अनुगार ठाकूर यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. केंद्र सरकार या विषयावर आपली काही भूमिका असेल तर ते स्पष्ट करेल. परंतु, G-20 सारख्या मुद्द्यावरून लक्ष वळवण्यासाठी काँग्रेस अशा अफवा पसरवत आहे, असे स्पष्टपणे अनुराग ठाकूर यांच्याकडून सांगण्यात आले आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांच्याकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तसेच, भारत या शब्दावर आक्षेप घेणारे लोक हे त्यांची मानसिकता दाखवून देत आहेत, असा टोला देखील ठाकूर यांनी काँग्रेसला लगावला आहे.

मी भारत सरकारचा मंत्री आहे. अनेक वृत्तवाहिन्यांच्या नावामध्येही भारत आहे. भारत नावाची अ‍ॅलर्जी असलेले हे लोक कोण आहेत? भारत या शब्दावर कोणी का आक्षेप घ्यावा? भारत नावाला कोण विरोध करत आहे? आता भारत शब्दाच्या उल्लेखाने वेदना होऊ लागल्या आहेत का? हे तेच लोक आहेत ज्यांना देशापेक्षा महत्त्वाचा पक्ष वाटतो. त्यांनी परदेशी भूमीतून देशाला बदनाम करण्याचाही प्रयत्न केला आहे, अशी अप्रत्यक्ष टीका त्यांच्याकडून काँग्रेस पक्षावर करण्यात आली आहे.

- Advertisement -

राष्ट्रपती भवनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आमंत्रण पत्रिकेबाबत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दावा करत म्हटले आहे की, राष्ट्रपती भवनात 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या G-20 डिनरच्या निमंत्रण पत्रात इंडियाचे राष्ट्रपती असे लिहिण्याऐवजी ‘भारताचे राष्ट्रपती’ असे लिहिले आहे. त्यांनी त्यांच्या X हँडलद्वारे लिहिले की, ‘ ही बातमी खरी आहे. राष्ट्रपती भवनाने 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या G-20 डिनरसाठी ‘इंडियाचे राष्ट्रपती’ ऐवजी ‘भारताच्या राष्ट्रपती’च्या नावाने आमंत्रणे पाठवली आहेत.

- Advertisment -