घरताज्या घडामोडीकेंद्रीय मंत्र्याच्या भावाचेच हाल; दीडतास उपचार न मिळाल्याने मृत्यू

केंद्रीय मंत्र्याच्या भावाचेच हाल; दीडतास उपचार न मिळाल्याने मृत्यू

Subscribe

केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांचे धाकटे भाऊ निर्मल चौबे यांचे निधन झाले आहे. बिहारमधील भागलपूर येथील मायागंज रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. निर्मल चौबे यांच्या मृत्यूनंतर रुग्णालय प्रशासनावर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला.

केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांचे धाकटे भाऊ निर्मल चौबे यांचे निधन झाले आहे. बिहारमधील भागलपूर येथील मायागंज रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. निर्मल चौबे यांच्या मृत्यूनंतर रुग्णालय प्रशासनावर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला. त्यानंतर याप्रकरणी दोन डॉक्टरांना निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. (union minister Ashwini Choubey brother died in bhagalpur hospital two doctors suspended)

मिळालेल्या माहितीनुसार, निर्मल चौबे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यावेळी तेथे डॉक्टर नव्हते. परिणामी, त्यांची प्रकृती सतत खालावत होती. बीपी मशीन म्हणजे काय हे अटेंडंटला माहीत नव्हते. उपचारासाठी वेळ लागत असल्याने त्यांची प्रकृती खालावत राहिली. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

याप्रकरणी डॉ. महेश कुमार आणि डॉ. असीम कुमार दास यांना रोषाला सामोरे जावे लागले. माहिती मिळताच पोलीस पोहोचले आणि लेखी तक्रार मिळाल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर रुग्णालयाच्या अधीक्षकांनी कर्तव्यावर गैरहजर असलेल्या दोन्ही डॉक्टरांना निलंबित केले. त्यानंतर पोलिसांनी कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक शांत झाले आणि मृतदेह घेऊन घरी गेले.

याप्रकरणी “घरी दुपारी चार वाजता वडिलांना छातीत दुखू लागले आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी चौबे यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगून त्यांना आयसीयूमध्ये हलवले”, असे निर्मल यांचा मुलगा नितेश चौबे यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांचे धाकटे भाऊ निर्मल चौबे यांचे निधन झाल्यानंतर नातेवाईक आणि युवा मोर्चाच्या नेत्यांनी रुग्णालयात गोंधळ घातला. निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांनी म्हटले आहे. रुग्णालयाचे अधीक्षक आयसीयूमध्ये पोहोचले, तेथे नातेवाईकांनी त्यांना घेराव घातला. घटनास्थळी पोहोचलेल्या डीएसपींनी कुटुंबीयांना लेखी तक्रार केल्यास चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यानंतर लोक शांत झाले.


हेही वाचा – टिपू सुलतान प्रकरणी भाजपा आणि मविआ आमने-सामने; सचिन सावंत म्हणतात…

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -