Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश ५० पेक्षा अधिक वयासाठी का दिली जातेय कोरोना लस, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

५० पेक्षा अधिक वयासाठी का दिली जातेय कोरोना लस, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

Related Story

- Advertisement -

देशातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची मंगळवारी ११ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या आरोग्य मंत्र्यांसह बैठक पार पडली. यावेळी कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावासंदर्भात आढावा घेण्यात आला. या ११ राज्यांमध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, पंजाब आणि राजस्थानचा देखील समावेश होता. यावेळी आरोग्यमंत्र्यानी सांगितले की, कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नाही, त्यामुळे आपल्या सर्वांना काळजी घेणं गरजेचं आहे, तर कोरोनामुळे ८० टक्क्यांहून अधिक मृत्यू हा ५० वर्षांहून अधिक असणाऱ्या व्यक्तींचा होत आहे. त्यामुळे या वयोगटातील व्यक्तींना प्राधान्याने कोरोना लसीकरण केले जात आहे, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.

- Advertisement -

देशात अनेक राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून ११ राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा ८० टक्क्यांहून अधिक असल्याचे समोर येत आहे. यासोबतच देशाचा रिकव्हरी रेट ९२.३८ टक्के असून देशात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर हा १.३० टक्के असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो, याचा कोणताही पुरावा नसल्याचेही त्यांनी सांगितले. तर देशात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येईल की नाही याविषयी असणाऱ्या नागरिकांच्या द्विधा मनस्थितीवर देखील केंद्रीय मंत्र्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘देशात सर्वात मोठा लॉकडाऊन करण्यात आला होता, तसाच लॉकडाऊन पुन्हा लागू शकतो, याची कोणतीही शक्यता नाही. मात्र ज्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जसा आहे तशाप्रकारे राज्यात असलेली परिस्थिती बघता ते राज्य निर्णय घेत आहेत.’

- Advertisement -

देशात गेल्या २४ तासात ९६ हजार ९८२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ४४६ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे, ५० हजारांहून अधिक रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ७ लाख ८८ हजार २२३ रुग्णांवर कोरोनाचे सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहे.


- Advertisement -