घरदेश-विदेश"हे घोड्यांच्या शर्यतीत गाढव धावण्यासारखे.." म्हणत केंद्रीय मंत्री पुरी यांची राहुल गांधींवर...

“हे घोड्यांच्या शर्यतीत गाढव धावण्यासारखे..” म्हणत केंद्रीय मंत्री पुरी यांची राहुल गांधींवर टीका

Subscribe

मोदी यांच्या आडनावावरून केलेल्या वादग्रस्त विधानावरून राहुल गांधी यांचे खासदाकरी पद रद्द करण्यात आले आहे. ज्यामुळे देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. पण यावरून आता केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे.

राहुल गांधी यांचे खासदारकी पद रद्द करण्यात आल्यानंतर भाजप सरकारविरोधात काँग्रेसकडून रविवारी (ता. २६ मार्च) सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. तर आजही संसदेच्या आवारात काँग्रेसकडून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध करण्यात आला. राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या या कारवाईबाबत सत्ताधाऱ्यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करत त्यांना गाढव असे म्हंटले आहे. तर सावरकर यांच्यावरून केलेल्या वक्तव्यावरून देखील पुरी यांनी राहुल गांधी यांना लक्ष केले आहे.

प्रसार माध्यमांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांना राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत प्रश्न विचारले असता ते म्हणाले की, राहुल गांधी यांना आत्मनिरीक्षण करण्याची गरज आहे. हे जे काही सुरू आहे, ते म्हणजे घोड्यांच्या शर्यतीत गाढवाला धावण्यासारखे आहे. म्हणजेच पुरी यांनी राहुल गांधी यांना गाढव म्हणत पंतप्रधान मोदी यांना घोड्याची उपमा दिली आहे.

- Advertisement -

यावेळी पुरी यांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यावर देखील निशाणा साधत टीका केली. “कुठे प्रभू राम आणि कुठे हे (काँग्रेस) लोक. मी सावरकर नाही, मी माफी मागणार नाही, असे यापूर्वी ते म्हणाले होते. त्यांना वीर सावरकरांसारख्या लोकांचे योगदान माहीत आहे का? हे घोड्यांच्या शर्यतीत गाढव धावण्यासारखे आहे. जे काही असेल ते भारतातील जनतेला ठरवू द्या. न्यायालयाने शिक्षा सुनावली असेल, तर त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेतूनच आपले म्हणणे मांडावे,” असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

तर पुढे बोलताना हरदीप सिंह पुरी म्हणाले की, “कायदा-सुव्यवस्था आणि राजकारणात काय चालते आणि काय नाही, यावरून काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी आपापसातील नाट्य कमी करून आत्मपरीक्षण केले पाहिजे. एक दिवस जनता नक्कीच त्यांच्याबद्दल निर्णय घेईल. आता या प्रक्रियेचा अवलंब करून न्यायालयाने त्यांना शिक्षा दिली आहे, त्यामुळे त्यांनी कायदा आणि संविधानाचा आदर केला पाहिजे.”

- Advertisement -

दरम्यान, राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे देशभरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तसेच त्यांच्यावर करण्यात आलेला कारवाई म्हणजे ही हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल असल्याचे बोलले जात आहे. तर याच मुद्द्यावरून आता विरोधकांनी केंद्र सरकारला घेरण्यास सुरूवात केली आहे.


हेही वाचा – “प्रधानमंत्री जी, आखिर इतना डर क्यों?;” अदानीच्या चौकशीवरून राहुल गांधींचा मोदींना प्रश्न

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -