घरअर्थजगतभारतीय अर्थव्यवस्था 2030मध्ये 10 ट्रिलियन डॉलरची होण्याच्या मार्गावर, केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी...

भारतीय अर्थव्यवस्था 2030मध्ये 10 ट्रिलियन डॉलरची होण्याच्या मार्गावर, केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे प्रतिपादन

Subscribe

मुंबई : भारत 2030 मध्ये 10 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आणि 2047 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे, असे प्रतिपादन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज केले.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संयुक्त विद्यमाने, सेंटर फॉर हाय टेक्नॉलॉजीद्वारे मुंबईत झालेल्या 25व्या ऊर्जा तंत्रज्ञान मेळाव्याला पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी मार्गदर्शन केले. देशातील नागरिकांसाठी ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या भारताच्या प्रगतीवर मंत्र्यांनी प्रकाश टाकला तसेच देशातील ऊर्जा मिश्रण अधिक शाश्वत आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या सरकारच्या योजनांची रूपरेषा सांगितली. यावेळी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली उपस्थित होते.

- Advertisement -

पूर्वी रिफायनिंग अँड पेट्रोकेमिकल्स टेक्नॉलॉजी मीट म्हणून ओळखल्या जाणार्‍या, या ‘नवीन ऊर्जा युगातील परिष्करण’ या संकल्पनेवर आधारित संमेलनात भारत आणि परदेशातील 1000हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. यावर्षी 15 ते 17 सप्टेंबर दरम्यान चालणारा हा कार्यक्रम, ऊर्जा क्षेत्राशी थेट संबंध असलेल्या अलीकडील काळातील प्रगती आणि तंत्रज्ञानाच्या विकासाचे प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा ठरला आहे.

देशाचा दरडोई ऊर्जेचा वापर सध्या जागतिक सरासरीच्या एक तृतीयांश आहे आणि येत्या काही वर्षांत तो जागतिक सरासरी ओलांडेल, असे सांगून पुरी म्हणाले, सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे निर्माण झालेली नवी आव्हाने समोर उभी असताना देखील, भारताने आपले शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य कायम ठेवले आहे. जागतिक संकटांच्या पार्श्वभूमीवर भारताने ऊर्जा, अन्न आणि इंधन या तीन आघाड्यांवर अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. ऊर्जेची उपलब्धता आणि किफायतशीरतेची हमी देत जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या संकटातून देशाला आत्मविश्वासाने मार्ग काढता आला, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

या ऊर्जा तंत्रज्ञान मेळाव्यात 15 तांत्रिक सत्रांमध्ये, एकूण 82 मौखिक शोध निबंध सादर केले जातील; ज्यात 43 परदेशी कंपन्यांच्या निबंधाचा तर परदेशातील 24 वक्त्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, आघाडीच्या तेल कंपन्या, तंत्रज्ञान तसेच सेवा प्रदात्यांनी आपले तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा याबाबत माहिती देणारे 16 प्रदर्शन स्टॉल्स देखील लावले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -