घरताज्या घडामोडीNEET: नीटमध्ये नापास होणारे विद्यार्थी जातात परदेशात, केंद्रीय मंत्री जोशींच्या वक्तव्यावर विरोधकांचा...

NEET: नीटमध्ये नापास होणारे विद्यार्थी जातात परदेशात, केंद्रीय मंत्री जोशींच्या वक्तव्यावर विरोधकांचा हल्लाबोल

Subscribe

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या वादग्रस्त विधानाने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. परदेशात शिकणारे ९० टक्के वैद्यकीय विद्यार्थी NEETमध्ये पास होऊ शकत नाहीत. त्यामुळेच ते शिक्षणासाठी परदेशात जातात, असं वक्तव्य भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केल्यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर हल्लाबोल केला जात आहे.

- Advertisement -

जोशींच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही केंद्रीय मंत्री जोशी यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रल्हाद जोशी यांनी विद्यार्थ्यांचा अपमान करणाऱ्या वक्तव्यावर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी शाब्दिक टीका केली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांबाबत केंद्रीय मंत्र्याचे असे वक्तव्य आपल्या अपमानापेक्षा कमी नाही, असे सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

भाजपच्या नेत्यांविरूद्ध कारवाईची मागणी

काँग्रेसच्या नेत्या रागिणी नायक यांनीही केंद्रीय मंत्री जोशी यांच्यावर निशाणा साधला. जोशी यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. जर तुम्ही कोणाचे दु:ख मांडू शकत नसाल तर अशी वक्तव्ये करू नका, असे काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलं आहे. एवढेच नाही तर अशा वक्तव्याबद्दल केंद्रीय मंत्री जोशी आणि पीएम मोदी यांनीही माफी मागावी, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील भाजपच्या नेत्यावर टीका केली आहे. युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक दोघांचीही स्थिती चांगली नाहीये. सर्वांचं लक्ष भारतीय प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यावर असले पाहिजे. अशा परिस्थितीत सुद्धा काही मंत्री चुकीचं आणि बेजबाबदार वक्तव्य करत आहेत.

दरम्यान भारतीय नागरिकांना सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी चार केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये पाठवण्याचा निर्णयही मोदी सरकारने घेतला आहे. ही जबाबदारी ज्योतिरादित्य सिंधिया, किरण रिजिजू, व्हीके सिंग आणि हरदीप सिंग पुरी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.


हेही वाचा : Mumbai Corona Update : मार्च महिन्याच्या दुसऱ्या दिवशी मृत्यूची संख्या शून्यच, २४ तासांत १०० कोरोनाबाधित रूग्णांची नोंद


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -