Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ड्रायव्हरचा मृत्यू, कुटुंबियांनी केला गंभीर आरोप

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ड्रायव्हरचा मृत्यू, कुटुंबियांनी केला गंभीर आरोप

Related Story

- Advertisement -

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये मालमत्ता विभागाच्या ड्रायव्हरचा ड्यूटी दरम्यान हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ड्रायव्हरच्या कुटुंबियांनी मालमत्ता विभागावर निष्काळजीपणाचा आरोप लावला आहे. वैद्यकीय रजा असूनही मंत्री नारायण राणे यांच्यासोबत ड्यूटी लावली होती. कुटुंबियांनी मालमत्ता विभाग अधिकारी विरोधात तक्रार दाखल केली असून पोलीस आता पुढील कारवाई करत आहेत.

माहितीनुसार, अशोक कुमार वर्मा राज्य मालमत्ता विभागात ड्रायव्हर म्हणून काम करत होते. जेव्हा केंद्रीय मंत्री नारायण राणे लखनऊला आले तेव्हा अशोक कुमार यांची ड्यूटी लावण्यात आली. यादरम्यान अशोक कुमार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ज्यानंतर अधिकाऱ्याच्या गाडीतून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

कुटुंबिय म्हणाले की, अशोक यांची प्रकृती बिघडली होती. ज्यामुळे ते वैद्यकीय रजेवर होते. परंतु जेव्हा नारायण राणे आले तेव्हा मेडिकल सुट्टी असूनही त्यांना जबरदस्तीने कामासाठी बोलावण्यात आले. कुटुंबियांनी मालमत्ता विभागातील वाहन विभागाचे प्रमुख अमरीश श्रीवास्तववर आरोप लावला की, त्यांना अशोक यांच्या प्रकृतीबाबत माहित होते, तरीही त्यांना फोन करून जबरदस्तीने बोलावले आणि आला नाहीतर निलंबित करण्याची धमकी दिली. ज्यामुळे मजबुरीने अशोक यांना ड्यूटीवर जावे लागले.

हजरतगंजचे एसीपी राघवेंद्र मिश्र म्हणाले की, अशोक कुमार वर्मा यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला आहे. कुटुंबियांनी हत्येचा आरोप लावला असून तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे याप्रकरणाची तपासणी करून पुढील कारवाई केली जाईल. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. त्यामुळे आता जे काही कारण असेल त्यानुसार कारवाई केली जाईल.

- Advertisement -

पुढे एसीपी म्हणाले की, नारायण राणे लखनऊ आले होते, तेव्हा अशोक कुमार यांची ड्युटी लावली होती. परंतु पत्नी रजनी वर्मा माध्यमांमध्ये मंत्री सुरेश राणा यांचे नाव घेत आहे. अशोक वर्मा लखनऊमधील निशातगंज पेपर मिल कॉलनीमध्ये आपल्या कुटु्ंबियांसोबत राहत होते. त्यांना ४ मुली आहेत.


हेही वाचा – करुणा शर्मा यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी


 

- Advertisement -