घरताज्या घडामोडीफास्ट टॅग तात्काळ खरेदी करा, मुदतवाढ दिली जाणार नाही - नितीन गडकरी

फास्ट टॅग तात्काळ खरेदी करा, मुदतवाढ दिली जाणार नाही – नितीन गडकरी

Subscribe

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वाहनधारकांना केले आवाहन

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने सर्व गाड्यांना फास्ट टॅग बंधनकारक केले असून १५ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी फास्ट टॅग प्रणालीला आता कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही आहे असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारी ही फास्ट टॅगसाठी शेवटची तारीख असणार आहे. यापूर्वी २ ते ३ वेळा फास्ट टॅगसाठी मुदतवाढ दिली होती. १ जानेवारीला फास्ट टॅग लागू करण्यात येणार होते, पण त्याची मुदत वाढून १५ फेब्रुवारी केली होती.

टोल नाक्यावरील वाहनांची कोंडी टाळण्यासाठी आणि महामार्गावरील वाहतुकी सुरळीत चालू ठेवण्यासाठी देशभरात इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टम फास्टटॅग आवश्यक असणार आहे. फास्ट टॅगचा प्रयोग ८० ते ९० टक्के यशस्वी पार पडला आहे. १० टक्के शिल्लक आहे. त्यामुळे यापुढे मुदतवाढ केली जाणार आहे. सर्व टोल नाक्यावर आणि उतर ठिकाणी फास्ट टॅग अनिवार्य आहे. त्यामुळे वाहनधारकांनी तात्काळ फास्ट टॅगची खरेदी करावी, असे आवाहन नितीश गडकरी यांनी केले आहे.

- Advertisement -

नाहीतर भरावा लागणार दुप्पट टोल

दरम्यान तुम्हाला नॅशनल हायवेवरील कोणताही टोलनाका क्रॉस करण्यासाठी फास्टटॅग गरजेचे आहे. फास्टटॅग प्रणालीमुळे कॅश ट्रान्झेक्शनाच्या तुलनेत टोल प्लाझामध्ये लागणारा वेळ बचत होणार आहे. पण जर फास्ट टॅग नसेल तर उद्यापासून (१५ फेब्रुवारी) तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागणार आहे.


हेही वाचा – फास्ट टॅगने होणार महामार्गाचा प्रवास सुसाट

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -