घरदेश-विदेशकेंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींकडून बिल्किस बानो प्रकारणातील आरोपींच्या सुटकेचे समर्थन; जनतेत मात्र संताप

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींकडून बिल्किस बानो प्रकारणातील आरोपींच्या सुटकेचे समर्थन; जनतेत मात्र संताप

Subscribe

गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, हे दोषी 14 वर्षे तुरुंगात असल्याने त्यांची सुटका करण्यात आली; त्याची वागणूक ‘चांगली’ असल्याचेही दिसून आले. सोबतच केंद्रानेही त्याला मान्यता दिली होती.

गुजरातमधील बिल्किस बानो (bilkis bano) सामूहिक बलात्कार प्रकरणातील 11 दोषींच्या सुटकेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी (pralhad joshi) यांनी बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेचा समर्थन केले. या प्रकरणात काहीही चुकीचे घडले नाही, असा युक्तिवाद प्रल्हाद जोशी यांनी केला. कायद्यानुसार दोषींची सुटका करण्यात आली.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सांगितले की, 2002 च्या बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील 11 दोषींना माफी देण्याच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर 29 नोव्हेंबर रोजी सुनावणी होईल. न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर गुजरात सरकारने दाखल केलेले उत्तर सर्व पक्षांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. गुजरात सरकारने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्यासाठी याचिकाकर्त्यांना वेळ देण्यात आला आहे.

- Advertisement -

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, “मला यात काहीही चुकीचे वाटत नाही, कारण ही कायद्याची प्रक्रिया आहे.” तुरुंगात “बराच वेळ” घालवलेल्या दोषींच्या सुटकेची तरतूद आहे आणि हे कायद्यानुसार केले जाते.

गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, हे दोषी 14 वर्षे तुरुंगात असल्याने त्यांची सुटका करण्यात आली; त्याची वागणूक ‘चांगली’ असल्याचेही दिसून आले. सोबतच केंद्रानेही त्याला मान्यता दिली होती.

- Advertisement -

बिल्किस बानो सामूहिक बलात्कारातील दोषींची 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी मुक्तता करण्यात आली असून संपूर्ण देशभरातच संतापाची लाट उसळत आहे. गुजरातच्या तुरुंगाबाहेर या दोषींना हार घालून आणि मिठाई खाऊ घालून त्यांचे वीरांप्रमाणे स्वागत करण्यात आले. पण जनता मात्र यावर संताप व्यक्त करा आहे.


हे ही वाचा – सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी आधीच ऑक्टोबर महिन्याचे वेतन मिळणार – देवेंद्र फडणवीस

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -