घरदेश-विदेशलोकशाहीसाठी नाही, तर कोटींची संपत्ती वाचवण्याचा प्रयत्न; स्मृती इराणींचा काँग्रेसवर हल्लाबोल

लोकशाहीसाठी नाही, तर कोटींची संपत्ती वाचवण्याचा प्रयत्न; स्मृती इराणींचा काँग्रेसवर हल्लाबोल

Subscribe

तपास यंत्रणेवर उघडपणे दबाव आणण्याच्या काँग्रेसच्या या रणनीतीला तुम्ही काय नाव द्याल? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या चौकशीसाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सोमवारी ईडीच्या कार्यालयात हजर झाले. मात्र राहुल गांधींना ईडीने बजावलेल्या समन्सविरोधात काँग्रेस नेते- कार्यकर्त्यांनी देशभरात आंदोलने केली. दिल्ली, महाराष्ट्रासह काँग्रेसशासित अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि नेते यात सहभागी झाले. राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांसह पक्ष कार्यालयापासून ते ईडी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. यावेळी काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. केंद्र सरकार एजन्सींचा गैरवापर करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. (union minister smriti irani attacks on congress on protest over ed summon to rahul gandhi)

काँग्रेसच्या आरोपांवर आता भाजपाने प्रत्युत्तर दिले आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत राहुल गांधी ईडी नोटीसीवरून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. राहुल गांधींच्या हाकेवर आज काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते जो गोंधळ घालत आहेत, त्यावरून मी देशाला सांगू इच्छितो की, हा लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न नाही, तर गांधी कुटुंबाची दोन हजार कोटींची मालमत्ता वाचवण्याचा प्रयत्न आहे. असा आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे.

- Advertisement -

जे जामिनावर बाहेर आहेत त्यांनी दिल्लीला घेराव घालण्याची घोषणा केली आहे, कारण आमचा भ्रष्टाचार पकडला गेला आहे. तपास यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी काँग्रेसशासित वरिष्ठ नेत्यांना खास निमंत्रित करण्यात आले आहे. तपास यंत्रणेवर उघडपणे दबाव आणण्याच्या काँग्रेसच्या या रणनीतीला तुम्ही काय नाव द्याल? राहुल गांधींना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलावले आहे, त्या विषयावर विचार करा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

स्मृती पुढे म्हणाल्या की, कंपनीची स्थापना समाजसेवेसाठी झाली आहे, परंतु समाजाची सेवा झालीच नाही, तर ही कंपनी केवळ गांधी परिवाराच्या सेवेपुरती मर्यादित राहिली. आज जे लोकं तपास यंत्रणेवर दबाव आणू इच्छितात त्यांचे लक्ष या विषयावर वेधून इच्छिते दिल्ली उच्च न्यायालयाच्या 2019 च्या निकालाच्या शिक्षेच्या या एका वाक्यावर… ‘एजीएलवर राहुल आणि सोनिया गांधी जी यांची मालकी बेकायदेशीरपणे घेण्याचा प्रयत्न तसेच मालमत्तेचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला.


एक कोटीच्या विम्यासाठी पत्नीने पतीचा काढला काटा; हत्येसाठी दिली दहा लाखांची सुपारी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -