केंद्रीय मंत्री सोम प्रकाश यांना धमकीचे पत्र, पंजाब पोलिसांकडून चौकशी सुरु

शेतकरी आंदोलनादम्यानही पंजाबमधील अनेक भाजप नेत्यांना धमक्या देण्यात आल्या. यावेळी सोमप्रकाश यांचे वाहनही आंदोलकांनी अडवले होते.

union minister som prakash gets threat letter at mohali residence punjab police investigating

केंद्रीय राज्यमंत्री सोम प्रकाश यांना त्यांच्या मोहाली येथील निवासस्थानी धमकीचे पत्र मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी हे संपूर्ण प्रकरण पंजाबचे डीजीपी व्हीके भंवरा यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. यानंतर आता मोहाली पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. दरम्यान हे धमकीचे पत्र कोणी पाठवल याचा तपास पोलीस करत आहेत.

पंजाबमध्ये गायक सिद्धू मूसेवालाची हत्या आणि मोहालीमधील पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर झालेला रॅकेट प्रोपेल्ड ग्रेनेड हल्ला पाहता आता पोलिसांना कोणताच धोका पत्करायचा नाही. त्यामुळे घटनेची माहिती मिळताच डीजीपींना तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री सोम प्रकाश हे हेशियारपूरचे खासदार आहेत. यापूर्वी ते फगवाड्याचे आमदारही होते.

शेतकरी आंदोलनादम्यानही पंजाबमधील अनेक भाजप नेत्यांना धमक्या देण्यात आल्या. यावेळी सोमप्रकाश यांचे वाहनही आंदोलकांनी अडवले होते. यानंतर त्यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली. यात आता धमकीचे पत्र मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. हे पत्र कोणी आणि कुठून पाठवण्यात आले याचा तपास पोलीस करत आहेत.

केंद्रीय राज्यमंत्री सोम प्रकाश यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने  माजी केंद्रीय मंत्री विजय सांपला यांच्या जागी होशियारपूरमधून तिकीट दिले होते, तेथून ते विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे डॉ. राजकुमार चब्बेलाल यांचा जवळपास 50 हजार मतांनी पराभव केला. सोम प्रकाश हे पंजाबमधील अशा नेत्यांपैकी एक आहेत जे प्रशासकाकडून राजकारणी बनले आहेत. ते पंजाब केडरचे 1988 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.


Live Update : बंडखोर आमदार आज गोव्याहून मुंबईत परतणार