घरदेश-विदेशमंकीपॉक्स रोगाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची मार्गदर्शक तत्त्वे जारी

मंकीपॉक्स रोगाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची मार्गदर्शक तत्त्वे जारी

Subscribe

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंकीपॉक्स (monkey pox) रोगाच्या व्यावस्थापनाबाबत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक तत्त्व जाहीर केली आहेत. क्लिनिकल नमुने एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम नेटवर्कद्वार NIV पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. आत्तापर्यंत भारतात मंकी पॉक्सचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

संसर्गजन्य कालावधीत रुग्ण किंवा त्यांच्या दूषित सामग्रीशी शेवटच्या संपर्कात आल्यापासून २१ दिवसांच्या कालावधीसाठी दररोज लक्ष ठेवले पाहिजे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health )मार्गदर्शक तत्त्वांत म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Monkeypox : भारतातही मंकीपॉक्सचा धोका वाढला; अशाप्रकारे पसरतोय संसर्ग; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

- Advertisement -

मंकीपॉक्स महामारी होणार नाही – डब्ल्यूएचओ

मंकीपॉक्स महामारी (monkey pox) होणार नाही, असा दावा डब्ल्यूएचओने केला आहे. या रोगाबाबत नेमकी स्पष्टता आलेली नाही. मंकीपॉक्सचे (monkey pox) रुग्ण मे महिन्याच्या सुरुवातीपासून जगभारात आढळून आगले आहेत. जगभरातील २४ देशात मंकीपॉक्सचे ४३५ हून अधिक रुग्ण आढळले आहेत. कोविड 19 आणि आरएनए व्हायरससारख्या इतर विषाणूंप्रमाणे हा रोग सहज प्रसारीत होत नाही, असा दावा डब्ल्यूएचओने केला आहे.

हेही वाचा – MonkeyPox alert : कोरोनानंतर देशात मंकीपॉक्सचा धोका; ‘या’ राज्याकडून अलर्ट जारी

डब्ल्यूएचओचे अधिकारी काय म्हणाले –

या क्षणी आम्हाला जागतिक महामारीची चिंता नाही. मात्र, वाढती प्रकरणे त्यांच्या चिंतेचे कारण असल्याचे त्यांनी मान्य केले. हा विषाणू प्रथम समलिंगी आणि उभयलिंगी पुरुषांमध्ये दिसून आला. भारतात अद्याप एकही केस आढळलेला नाही परंतु सतर्कता वाढली आहे, असे डब्ल्यूएचओचे अधिकारी रोसामुंड लुईस यांनी सांगितले

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -