घरठाणेThane-Diva Railway : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला ठाणे...

Thane-Diva Railway : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला ठाणे – दिवा लोकल प्रवास

Subscribe

केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबत केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री राबसाहेब दानवे आणि इतर मंत्री देखील लोकलने प्रवास करताना दिसले. 

Thane-Diva Railway : ठाणे – दिवा ५व्या आणि ६व्या रेल्वे मार्गाचे आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकार्पण करुन अतिरिक्त उपनगरीय सेवांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. देशाचे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे देखील या लोकार्पण सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानिमित्त रेल्वे मंत्री पहिल्यांदाच मुंबईत देखील आले आहेत.  मंत्री अश्विन वैष्ण हे मुंबईत दाखल होताच त्यांनी ठाणे – दिवा दरम्यान मुंबई लोकलने प्रवास केला. यावेळी ते सर्वसामन्यांसोबत प्रवास करताना दिसले. त्यांनी रेल्वेच्या डब्ब्यातील सर्व प्रवाशांची चौकशी केली. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबत केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री राबसाहेब दानवे आणि इतर मंत्री देखील लोकलने प्रवास करताना दिसले.

पाहा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा ठाणे-दिवा लोकल प्रवास

- Advertisement -

मध्य रेल्वेवर 36 अतिरिक्त उपनगरीय लोकल फेऱ्या सुरू करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीहून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकार्पणाला उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे राज्यापाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेबलिंकद्वारे या कार्यक्रमात सामील होतील. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के,खासदार श्रीकांत शिंदे, कुमार केतकर, डॉ. विनय सहस्रबुद्धे ,प्रमोद (राजू) पाटील,आमदार संजय केळकर आणि इतर उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

सुधारित वेळापत्रक

• मेन लाईनवर 36 अतिरिक्त सेवा. मेन लाईनवरील एकूण सेवांची संख्या 858 वरून 894 पर्यंत वाढणार.
• मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील एकूण उपनगरीय सेवांची संख्या 1774 वरून 1810 पर्यंत वाढणार
• मेन लाईनवर एकूण वातानुकुलीत उपनगरीय सेवांची संख्या 10 वरून 44 पर्यंत वाढणार म्हणजेच मेन लाईनवर 34 नवीन वातानुकुलीत उपनगरीय सेवा. 44 वातानुकुलीत सेवांपैकी 25 वातानुकुलीत सेवा जलद सेवा म्हणून चालतील म्हणजेच 24 जलद आणि एक अर्ध जलद
• जलद लाईन सेवांची एकूण संख्या 257 वरून 270 पर्यंत वाढणार म्हणजे 13 आणखी जलद लाईन सेवा
• एकूण धीम्या मार्गावरील सेवांची संख्या 601 वरून 624 पर्यंत वाढणार आहे, म्हणजे आणखी 23 धीम्या मार्गावरील सेवा
• 5व्या आणि 6व्या मार्ग कार्यान्वित झाल्यामुळे काही अर्ध-जलद सेवा जलद किंवा धीम्या सेवांमध्ये रूपांतरित करण्यात आल्या.


हेही वाचा – Central Railway : ठाणे-दिवा ५व्या आणि ६व्या रेल्वे मार्गाचे आज पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण, 36 अतिरिक्त उपनगरीय लोकल फेऱ्या वाढणार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -