केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांना कोरोनाची लागण

Union Water Power Minister Gajendrasingh Shekhawat Corona Positive
केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांना कोरोनाची लागण

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती स्वत: गजेंद्रसिंग शेखावत यांनी ट्विट करुन दिली आहे. गजेंद्रसिंग शेखावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधी केंद्रातील मोदी सरकारमधील गृहमंत्री अमित शाह आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.

“कोरोनाची काही लक्षणे दिसल्यामुळे कोरोना चाचणी केली असता त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णालयात दाखल केले जात आहे. मी विनंती करतो की यापूर्वी जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वत: ला आयसोलेट करुन घ्या आणि चाचणी करुन घ्या. प्रत्येकजण निरोगी रहा आणि स्वत: ची काळजी घ्या,” असे ट्विट गजेंद्रसिंग शेखावत यांनी केले आहे.