घर देश-विदेश यूएईच्या अंतराळवीराने टिपले हिमालयाचे अनोखे छायाचित्र, सोशल मीडियावर व्हायरल

यूएईच्या अंतराळवीराने टिपले हिमालयाचे अनोखे छायाचित्र, सोशल मीडियावर व्हायरल

Subscribe

नवी दिल्ली : चंद्राच्या पृष्ठभागाजवळ पोहोचलेल्या चांद्रयान-3च्या लँडर इमेजर (LI) कॅमेऱ्याने टिपलेला पृथ्वीचा फोटो अलीकडेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) जारी केला होता. आता संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) अंतराळवीर सुल्तान अल नेयादी यांनी अंतराळातून टिपलेले हिमालय पर्वतरागांचे चित्र ट्वीट केले आहे. आपल्या गृहावरील समृद्ध निसर्गाची अनोखी ओळख असलेले हे अंतराळातून दिसणारा अद्भूत बर्फाच्छादित हिमालय आहे, असे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

अंतराळवीर सुल्तान अल नेयादी हे सध्या सहा महिन्यांच्या अंतराळ मोहिमेवर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) आहेत, तेथून त्यांनी ट्विटरवर हिमालयाची दोन छायाचित्रे पोस्ट केली. दोन फोटो शेअर केले आहेत. हिमालय पर्वताचे विहंगम दृश्य पाहून नेटिझन्स खूश झाले आहेत. नेयादी यांनी या दोन फोटोंना कॅप्शन दिले आहे, पृथ्वीवर समुद्रसपाटीपासून सर्वाधिक उंचीवर असलेला हा हिमालय. हे पर्वत आपल्या ग्रहाच्या समृद्ध निसर्गातील एक प्रतिष्ठित स्थळ आहे. अल नेयादी यांचे हे ट्वीट जवळपास 50 हजार लोकांनी पाहिले असून त्याला जवळपास 705 लोकांनी लाइक तर, 143 जणांनी रीट्वीट केले आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा – किंग कोण? नरेंद्र मोदी की राहुल गांधी… भाजप आणि काँग्रेसमध्ये दावे- प्रतिदावे

- Advertisement -

चांद्रयान-3ने टिपले चंद्र आणि पृथ्वीचे छायाचित्र
भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम चांद्रयान-3 ने चंद्राच्या परिघात यशस्वीरित्या प्रवेश केल्यानंतर आधी चंद्राचे काही फोटो टिपले होते. ते इस्रोने सोशल मीडियावरून शेअर केले होते. त्यापाठोपाठ चांद्रयान-3च्या लँडर इमेजर (LI) कॅमेऱ्याने पृथ्वीचा फोटो पाठवला असल्याची माहिती इस्रोने दिली. चंद्राच्या तिसर्‍या कक्षेत पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी चांद्रयान-3ने लँडर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी (LHVC) कॅमेऱ्यातून हा फोटो टिपला. 14 जुलै रोजी चांद्रयान-3 प्रक्षेपित करण्यात आले होते.

- Advertisment -