विमानात बिजनेस क्लासमध्ये महिला प्रवाशावर बलात्कार

विमानात लैंगिक अत्याचार होण्याची घटना ही दुर्मिळ समजली जाते. पण एका अहवालानुसार गेल्या काही दिवसात अमेरिकेत विमानात लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे.

अमेरिकेतील न्यू जर्सीहून लंडनला जाणाऱ्या United Airlines फ्लाईटच्या बिजनेस क्लासमध्ये एका महिला प्रवाशावर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी एकाला ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली आणि नंतर त्याला जामिन देण्यात आला आहे. ही घटना गेल्या आठवड्यात सोमवारी घडली आहे.

‘द सन’ने याबद्दल वृत्त दिले आहे. त्यानुसार ही घटना जेव्हा घडली त्यावेळी इतर प्रवासी झोपले होते. पीडित महिलेने याबद्दल विमान क्रूला सांगितल्यानंतर ब्रिटन पोलिसांना याबदद्ल कळवण्यात आले. त्यानंतर ब्रिटनमधील हीथ्रो विमानतळावर पोहचताच आरोपीला अटक करण्यात आली. तर पीडित महिलेला समुपदेशनासाठी सेंटरवर नेण्यात आले आहे. पीडित महिला आणि आरोपी हे दोघेही ब्रिटनचे रहीवासी आहेत. दोघांची ओळख फ्लाईट येण्याच्या काहीवेळा आधी लाऊंज एरियामध्ये झाली होती. त्यानंतर दोघांनी एकत्र मद्यसेवनही केले. पण दोघे वेगवेगळ्या रांगेत बसले होते.

विमानात लैंगिक अत्याचार होण्याची घटना ही दुर्मिळ समजली जाते. कारण क्रू मेंबर्स सतत प्रवाशांची विचारपूस करण्यासाठी तेथे हजर असतात. पण एका अहवालानुसार गेल्या काही दिवसात अमेरिकेत विमानात लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे.