आश्चर्यकारक! कोणत्याही औषधांशिवाय जगातील दुसरा HIV रुग्ण झाला बरा

united kingdom a second patient cured from hiv virus
आश्चर्यकारक! कोणत्याही औषधांशिवाय जगातील दुसरा HIV रुग्ण झाला बरा

जगात दुसऱ्यांदा असं घडून आलं आहे की, कोणत्याही उपचारांशिवाय HIV बाधित रुग्ण बरा झाला आहे. ‘अँटीरेट्रोव्हायरल’ औषधांचा वापर न करता हा रुग्ण एचआयव्हीपासून बरा झालाय. अशी माहिती शास्त्रज्ञांनी मंगळवारी जाहीर केली आहे. एनल्स ऑफ इंटर्नल मेडिसिन या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या निष्कर्षात असे दिसून आले की, एचआयव्हीने ग्रस्त असलेला या रुग्णावर कोणतेही उपचार झाले नव्हते. या रुग्णाच्या १.५ अब्जाहून अधिक रक्त आणि ऊतक पेशींचा अभ्यासात विषाणूच्या जीनोमचा कोणताही पुरावा आढळला नाही.

… तर विकसित होऊ शकतात उपचार

आंतरराष्ट्रीय संघाने नमूद केले की, जर संशोधकांना यातील रोगप्रतिकारक यंत्रणा समजू शकली तर उपचार प्रक्रिया विकसित केली जाऊ शकते. ज्यामुळे इतर एचआयव्ही बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी एक उपचार पद्धती तयार करुन त्यांची रोगप्रतिकारक यंत्रणा चांगली करता येईल. संशोधकांनी सांगितले की, एचआयव्हीचे विषाणू डीएनए किंवा पेशींची अनुवांशिका सामग्री जीनोम स्वरुपात संचयित करतात. ज्याला व्हायरल स्टोरेज असेही म्हणतात.
अशा परिस्थितीत, एचआयव्ही विरोधी औषधे आणि शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीद्वारे विषाणू प्रभावीपणे संपवता येतो. बहुतेक लोकांमध्ये या स्टोअरमधून सतत नवीन विषाणूजन्य कण तयार केले जात आहेत.

एचआयव्ही व्हायरल जीनोमबद्दल आहे

अँटी-रेट्रोव्हायरल थेरपी (एआरटी)नुसार नवीन व्हायरसची निर्मिती रोखता येऊ शकते, परंतु ते पूर्णपणे काढून टाकता येत नाही. यामुळे विषाणूवर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज उपचार करावे लागतात. त्यांच्या मागील अभ्यासात, शास्त्रज्ञांनी एक रुग्ण ओळखला ज्याच्या जीनोममध्ये एचआयव्ही व्हायरल जीनोम आढळले नाही. यातून असे दिसते की, रोगप्रतिकारक शक्तीमुळे एचआयव्हीला रोखणे शक्य होत आहे.