घरAssembly Battle 2022Punjab Assembly Election 2022: टोल फ्री प्रवास, स्वस्त वीज ; पंजाबसाठी संयुक्त...

Punjab Assembly Election 2022: टोल फ्री प्रवास, स्वस्त वीज ; पंजाबसाठी संयुक्त समाज मार्चाकडून जाहीरनामा

Subscribe

पंजाबसाठी संयुक्त समाज मोर्चाकडून काल(मंगळवार) जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात पंजाबचे राज्यमार्ग टोलमुक्त करणार असल्याचं आश्वासनं पक्षाकडून देण्यात आलंय. तसेच मोर्चाने शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. छोट्या व्यापाऱ्यांना २ टक्के व्याजदराने ५ लाख रूपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. प्रेस क्लबमध्ये संयुक्त समाज मोर्चाकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणारे बलबीर सिंग राजेवाल यांच्याकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.

संयुक्त समाज मोर्चाकडून आश्वासनं –

सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक ३ लाख रूपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारकडून पाकिस्तान आणि मध्य आशियामध्ये पंजाबच्या कृषी उत्पादनांच्या व्यापाराच्या सुविधेसाठी हुसैनीवाला आणि वाघा बॉर्डर ओपन करण्यास सांगणार आहेत.

नोंदणी आणि हस्तांतरण कालबद्ध केले जाणार आहेत. तसेच ही प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे.

- Advertisement -

मोठ्या, भांडवली उद्योगांना आणि व्यापारांना प्रोत्साहन देऊन लघु उद्योगांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जाणार आहेत.

पंजाब विधानसभेचे कामकाज वर्षभरात ९० दिवसांसाठी सुरू राहणार आहे. यामध्ये ७५ टक्के आमदारांची उपस्थिती निश्चित केली जाणार आहे. तसेच आमदारांना एकच पेन्शन दिली जाणार आहे.

राजकीय नेते आणि नोकरशहाच्या माध्यमातून कोट्यवधी रूपये आणि इतर संसाधनांची चौकशी करण्यासाठी जबाबदारी आयोगाची स्थापना केली जाणार आहे.

देशद्रोहाचा नियम आणि अन्य काळे कायदे रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.


हेही वाचा : Punjab Election 2022: पंजाब निवडणुकीमध्ये पाच प्रमुख जागांसाठी दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, जाणून घ्या


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -