घरताज्या घडामोडीCoronaVirus: अमेरिकेत मृत्यूचे तांडव; एकाच दिवशी ३ हजार १७६ जणांचा बळी!

CoronaVirus: अमेरिकेत मृत्यूचे तांडव; एकाच दिवशी ३ हजार १७६ जणांचा बळी!

Subscribe

जगात कोरोनामुळे सर्वाधिक बळी अमेरिकेत गेले आहेत. अमेरिकेतील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे.

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. संपूर्ण जगात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. जगात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण अमेरिकेत सापडले आहे. दिवसेंदिवस अमेरिकेतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला असला तरी अमेरिकेतील मृतांचा आकडा वाढत आहे. गेल्या २४ तासात कोरोनामुळे अमेरिकेत ३ हजार १७६ जण मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे आकडा जवळपास ५० हजारपर्यंत पोहोचला असल्याची माहिती जॉन हॉपकिंस युनिव्हर्सिटीने दिली आहे.

- Advertisement -

अमेरिकेत कोरोनामुळे संक्रमित झाल्यांची संख्या आणि मृतांची संख्या जगात सर्वाधिक आहे. अमेरिकेत वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत अमेरिकेत कोरोनाचे ८ लाख ८६ हजार ७०९ रुग्ण आढळले आहेत. तर त्यापैकी ५० हजार २४३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच ८५ हजार ९२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. न्यूयॉर्क कोरोनाग्रस्तांची संख्या २ लाखाहून अधिक आहे.

अमेरिके पाठोपाठ स्पेन, इटली, फान्स, जर्मनी, ब्रिटन या देशांमध्ये कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले आहेत. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १६ लाखांहून अधिक आहे. तर मृतांचा आकडा १ लाख ८३ हजारहून अधिक आहे. जगभरात आतापर्यंत ७ लाखाहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मात्र जगात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्यामुळे भीतीच्या वातावरणात भर पडत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: उष्ण आणि दमट वातावरणात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल – ट्रम्प


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -