घरदेश-विदेशPunjab Gas Leak लुधियानात गॅस गळती, २ मुलांसह ११ जणांचा मृत्यू; दूध...

Punjab Gas Leak लुधियानात गॅस गळती, २ मुलांसह ११ जणांचा मृत्यू; दूध घेण्यास गेलेला प्रत्येकजण बेशुद्ध

Subscribe

पंजाबच्या लुधियानामध्ये रविवारी सकाळी गॅस गळती झाली, यात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाच महिला, चार पुरुष आणि दोन मुलांचा समावेश आहे. लहान मुलांचे वय १० ते १३ वर्षे आहे.

 Ludhiana gas leak लुधियाना – पंजाबच्या लुधियानामध्ये रविवारी सकाळी गॅस गळती झाली, यात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाच महिला, चार पुरुष आणि दोन मुलांचा समावेश आहे. लहान मुलांचे वय १० ते १३ वर्षे आहे. ही घटना लुधियाना शहराजवळील ग्यासपुरा इंडिस्ट्रियल एरियाजवळ एका इमारतीमध्ये घडली आहे. लुधियानाच्या एसडीएम स्वाती यांनी सांगितले, की सकाळी ७.१५ वाजता येथे गॅस गळती झाली. यानंतर १२ जण बेशुद्ध पडले. (Punjab Giaspura Factory Gas Leak)

घटनास्थळी मेडिकल स्टाफ, फायर ब्रिगेड, पोलिस आणि NDRF ची टीम दाखल झाली आहे. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील स्थानिक आमदार राजिंदरपाल कौर म्हणाल्या की या इमारतीमध्ये एक दुध डेअरी सुरु आहे. जो कोणी सकाळी दूध घेण्यासाठी गेला तो बेशुद्ध झाला. प्रशासनाने या इमारतीपासून एक किलोमीटरचा परिसर सीलबंद केला आहे.

- Advertisement -

इमारतीच्या आसपास असलेल्या लोकांनाही बाधा
रहिवासी भागात असलेल्या या इमारतीत गॅस गळती झाली आहे. इमारतीच्या ३०० मीटर परिसरातील लोकांना याची बाधा झाली आहे. अनेक लोक बेशुद्ध झाले आहेत. इमारतीच्या आसपास असलेली घरे आणि ढाब्यांवर असलेले लोकही बेशुद्ध झाले आहेत. प्रशासनाने ड्रोनच्या मदतीने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. लुधियानाचे पोलिस आयुक्त मनदीप सिद्धू म्हणाले, ज्या इमारतीत गॅस गळती झाली आहे, तेथील सर्व लोकांना बाहेर काढले आहे.

- Advertisement -

कोणता गॅस लिक याची माहिती नाही
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस गळती झाली आहे. मात्र कोणता गॅस लिक झाला याची अद्याप माहिती मिळालेली नाही. प्राथमिक माहितीनुसार, गॅसची दुर्गंधी ही सीवरेज गॅससारखी असल्याचे सांगण्यात आले. नेमका कोणता गॅस लिक झाला होता, ज्यामुळेही दुर्घटना झाली याचा तपास करण्यासाठी यंत्रणा घटनास्थळी पोहोचली आहे.
पोलिस आयुक्त सिद्धू म्हमाले, ड्रेनेजमधील गॅसमध्ये अॅसिड असल्यामुळेही असे होऊ शकते. किंवा यात काही केमिकल आहेत का याचाही तपास केला जात आहे. वास्तविक संपूर्ण तपासानंतरच ही घटना का आणि कशामुळे घडली हे समोर येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -