घरअर्थजगतअनलॉक १.० चा शेअर बाजारावर परिणाम, सेन्सेक्स १०५० अंकांनी वधारला

अनलॉक १.० चा शेअर बाजारावर परिणाम, सेन्सेक्स १०५० अंकांनी वधारला

Subscribe

निफ्टी ९८०० पार

आजपासून देशात अनलॉक १.० ची सुरूवात झाली असून शेअर बाजारावर याचा चांगलाच परिणाम दिसून आला आहे. शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे. सकाळी ११.५७ वाजता मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ३.२४ टक्क्यांसह वाढून १०५१.०१ अंकांनी वाढून ३३४७४.११ वर पोहोचला. तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीमध्येही जोरदार वाढ दिसून आली. ३.०६ टक्क्यांसह २९३.२५ अंकांनी वाढून ९८७३.५५ वर पोहोचली. वेगवेगळ्या देशांच्या सरकारने हळू हळू व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक पुनरुज्जीवन होण्याची आशा निर्माण झाली आहे. सुरुवातीला सेन्सेक्स १.६१ टक्क्यांसह ५२१.२० अंकांनी वाढून ३२९४५.३० वर शेअर बाजार उघडला. निफ्टी १.५० टक्क्यांच्या वाढीसह १४३.९० अंकांनी ९७२४.२० वर उघडला.

सुरुवातीला डॉलरच्या तुलनेत रुपया ३२ पैशांनी वधारला

सोमवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया ३२पैशांनी वाढून ७५.३० वर उघडला. स्थानिक अर्थव्यवस्था टप्प्याटप्प्याने उघडण्याच्या सरकारच्या निर्णयाचा रुपयावर सकारात्मक परिणाम झाला. परकीय चलन व्यापाऱ्यांच्या मते, परकीय भांडवलाची आवक, अमेरिकन चलनाच्या विनिमय दरात घसरण आणि देशांतर्गत शेअर बाजारात चांगली सुरुवात यामुळे गुंतवणूकदार थोडेसे आशादायी झाले आहेत.

- Advertisement -

काय आहे मोठ्या शेअर्सची स्थिती

आज अदानी पोर्ट्स, सन फार्मा, एचडीएफसी, टीसीएस, रिलायन्स, आयओसी, एचसीएल टेक, इन्फोसिस, ब्रिटानिया आणि टेक महिंद्रा यांचे शेअर्स ग्रीन मार्कवर उघडले. त्याचबरोबर इन्फ्राटेल, एनटीपीसी, गेल, हीरो मोटोकॉर्प, झी लिमिटेड, अ‍ॅक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, बीपीसीएल, ग्रासिम आणि बजाज फायनान्सचे शेअर्स लाल मार्कवर उघडले.


हेही वाचा – केरळमध्ये मान्सून दाखल; येत्या २४ तासांत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

- Advertisement -

जर आपण सेक्टरोरल इंडेक्सकडे पाहिले तर आज सर्व क्षेत्रे ग्रीन मार्कवर उघडली. यात ऑटो, आयटी, एफएमसीजी, मीडिया, फार्मा, रिअल्टी, बँक, खासगी बँक, मेटल आणि पीएसयू बँक यांचा समावेश आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -