अनलॉकची अंमलबजावणी काटेकोरपणे करा, केंद्रीय गृहसचिवांचे राज्यांना पत्र

Lockdown to unlock

भारतात एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे मात्र अनलॉक प्रक्रियेत सर्व राज्यांना सूचना केली आहे की, यापुढच्या काळात कोरोनापासून सुरक्षेच्या नियमांमध्ये कोणतीही बेशिस्तपणा येऊ नये. कोरोना प्रतिबंधासाठी टेस्ट, ट्रॅक ट्रिट स्ट्रॅटेजी अंमलात आणा अशा सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारला केल्या आहेत. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व मुख्य सचिवांना सुचवले आहे की, अनलॉकची संपुर्ण प्रक्रिया ही सुरक्षितपणे राबवा. कोरोनाच्या बाबतीत covid-19 ची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सांगितल्यानुसार अनेक राज्यात सक्रीय रूग्णांची संख्या आता कमी होत आहे. त्यामुळेच अनेक राज्यांनी कोरोना विरोधी नियमावलीत सूट देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रत्यक्ष परिस्थितीच्या आधारावरच निर्णय घेण्याची गरज आहे. अनलॉकचे नियम काळजीपूर्व पद्धतीने घेण्याची गरज असल्याचे त्यांनी लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. अनलॉक प्रक्रियेदरम्यान पाच स्तराची स्ट्रॅटेजी करणे गरजेचे आहे. त्यामध्ये टेस्ट – ट्रॅक – उपचार आणि लसीकरण करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. कोरोनाच्या नियमित अशी मॉनिटरींगची गरज आहे. त्यासोबत मास्कचा नियमित वापर, हातांची स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग आणि बंद जागांमध्ये वेंटिलेशनची सुविधा अशा प्रकारची गोष्टी प्राधान्याने करणे गरजेचे असल्याचे त्यांनी पत्रात नमुद केले आहे.

कोरोनाची नियमावलीत शिथिलता आणताना काही राज्यांमध्ये गर्दी निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच कोरोनाच्या काळात कोरोना नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी पत्रात नमुद केले आहे. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी कोरोना विरोधी लसीकरणाची यशस्वीपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्यामुळेच कोरोनाविरोधी लसीकरणाची मोहीम वेगाने राबवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. जेणेकरून अधिकाधिक लोकांची लसीकरण करणे शक्य होईल असेही त्यांनी पत्रात नमुद केले आहे.