Unlock in Delhi : शाळा, जिम, जलतरण तलाव ७ फेब्रुवारीपासून सुरु, दिल्ली सरकारची नियमावली जारी

दिल्लीतील मैदाने आणि मनोरंजन पार्क ५० टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. तसेच लग्न सोहळ्याला २०० लोकांचा समावेश करण्याची परवानगी दिली आहे.

Unlock in Delhi Government regulations issued Schools gyms swimming pools starting from February 7
Unlock in Delhi : शाळा, जिम, जलतरण तलाव ७ फेब्रुवारीपासून सुरु, दिल्ली सरकारची नियमावली जारी

दिल्लीमधील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक आपत्ती व्यवस्थापन अथॉरिटीने घेतली. राज्यातील कोरोना परिस्थितीचा विस्तृत आढावा या बैकीत घेण्यात आला. कोरोना बाधितांच्या घटत्या संख्येमुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. दिल्लीतील शाळा ७ फेब्रुवारीपासून सुरु करण्यात येणार आहेत. तर जिम, स्विमिंग पूल आणि मैदाने खुले करण्यात येणार आहे. सार्वजनिक वाहतूक पूर्ण क्षमतेने करण्यात येणार आहे. परंतु रात्रीची संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी असेल.

दिल्लीत कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ झाली होती. यामुळे दिल्ली सरकारने राज्यात कडक निर्बंध आणि रात्रीची संचारबंदी लागू केली होती. अखेर राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत. कोरोनाच्या नव्या नियमावलीनुसार ७ फेब्रुवारीपासून शाळा आणि कोचिंग क्लासेस सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये ऑनलाईन क्सासेस नसतील मात्र शाळा टप्प्याटप्प्यान सुरु करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात ७ फेब्रुवारीला ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांची शाळा आणि कॉलेजला परवानगी देण्यात आली आहे. यांची ऑनलाईन शिकवणी सध्या सुरु राहणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात १४ फेब्रुवारी नर्सरी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांची शाळा सुरु करण्यात येणार आहे. दोन्ही लस घेतलेल्या शिक्षकांनात शाळेत शिकवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दिल्लीत रात्रीची संचारबंदी कायम

दिल्लीत रात्रीची संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. संचारबंदीची वेळ आता रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आला आहे. रेस्टॉरंट आता रात्री ११ पर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहेत. यापूर्वी १० वाजेपर्यंत रेस्टॉरंट सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. प्रायव्हेट आणि सरकारी कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. कारमध्ये फक्त एकच व्यक्ती प्रवास करत असेल तर त्याला मास्क घालण्याची गरज नाही.

दिल्लीतील मैदाने आणि मनोरंजन पार्क ५० टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. तसेच लग्न सोहळ्याला २०० लोकांचा समावेश करण्याची परवानगी दिली आहे.


हेही वाचा : राहुल गांधींचा चिनी आयातीवरून मोदी सरकारवर निशाणा; म्हणाले, ‘जुमला फॉर इंडिया, जॉब्स फॉर चायना’