घरदेश-विदेशश्रीलंकेत अभूतपूर्व संकट, समुद्रात पेट्रोलचं जहाज उभं, पण घ्यायला पैसेच नाहीत

श्रीलंकेत अभूतपूर्व संकट, समुद्रात पेट्रोलचं जहाज उभं, पण घ्यायला पैसेच नाहीत

Subscribe

जूनमध्ये श्रीलंकेला इंधन आयातीसाठी 53 कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे. त्यांना भारताकडून कर्ज सुविधा मिळत असली तरी दोन वर्षांपूर्वीच्या प्रतिमहिना 15 कोटी डॉलरच्या तुलनेत इंधन खरेदी करण्यासाठी 50 कोटी डॉलरची आवश्यकता आहे.

कोलंबोः श्रीलंकेमध्ये अभूतपूर्व अशी परिस्थिती उद्भवली असून, समुद्री क्षेत्रात जवळपास दोन महिन्यांपासून पेट्रोलनं भरलेलं जहाज उभं आहे, पण त्यांच्याकडे ते पेट्रोल घेण्यासाठी परकीय चलन नाही. विशेष म्हणजे सरकारनं सांगितलं की, डिझेलचा पुरेसा साठा आहे. ऑनलाईन पोर्टल न्यूजफर्स्ट डाट एलकेच्या रिपोर्टनुसार, वीज आणि ऊर्जामंत्री कंचना विजेसेकेरा यांनी संसदेला सांगितलं की, 28 मार्चपासून श्रीलंकेच्या समुद्री क्षेत्रात पेट्रोलच्या साठ्यानं भरलेलं एक जहाज उभं आहे, पण त्याचे पैसे देण्यासाठी श्रीलंकेकडे डॉलर उपलब्ध नाहीत.

तसेच जानेवारी 2022 मध्ये मागच्या खेपेचे त्याच जहाजाचे 5.3 कोटी डॉलर पैसे देणं बाकी आहे. मंत्र्यांनी सांगितलं की, शिपिंग कंपनीनं दोन्हीचे पैसे देत नाही, तोपर्यंत जहाज परत पाठवण्यास नकार दिला आहे. त्यामुळेच आम्ही लोकांना इंधनासाठी मोठी रांग लावू नका, असं आवाहन केलं आहे. डिझेलसंदर्भात कोणतीही समस्या नाही. आमच्याकडे पेट्रोलचाही मर्यादित साठा आहे आणि त्याला गरजेनुसार आवश्यक सेवा, विशेष स्वरूपात अँब्युलन्सला वितरित करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

- Advertisement -

इंधन आयातीसाठी 53 कोटी डॉलरची गरज

सर्वच इंधन पंपांना पेट्रोल वितरीत करण्यासाठी शुक्रवारपासून तीन दिवस आणखी लागणार आहेत. जूनमध्ये श्रीलंकेला इंधन आयातीसाठी 53 कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे. त्यांना भारताकडून कर्ज सुविधा मिळत असली तरी दोन वर्षांपूर्वीच्या प्रतिमहिना 15 कोटी डॉलरच्या तुलनेत इंधन खरेदी करण्यासाठी 50 कोटी डॉलरची आवश्यकता आहे. श्रीलंकेत इंधनाच्या मागील आयात खेपेसाठी 70 कोटी डॉलरहून अधिक पैसे द्यावे लागले होते.

राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच संसदेत पोहोचले महिंदा

श्रीलंकेचे माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे हे राजीनाम्याच्या नऊ दिवसांनंतर बुधवारी संसदेत पोहोचलेत. त्यांना समर्थकांच्या आणि सरकारच्या विरोधी पक्षांमध्ये झालेल्या झटापटीनंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

- Advertisement -

चीनकडून रेशन वाटपाचं राजकारण

एएनआयच्या वृत्तानुसार, आवश्यक वस्तूंच्या तुटवड्यामुळे चीनकडून श्रीलंकेत अन्नधान्याचं वाटप केले जात आहेत. त्यामुळेही तिकडे असंतोष निर्माण झाला आहे. विदेशी अधिकाऱ्यांना प्रभावित करण्यासाठी चीन तांदूळ आणि डाळ सारखं धान्याच्या वाटपाचा दिखावा करत आहे. श्रीलंकेच्या गावांमध्ये चिनी सरकारकडून वाटण्यात येत असलेल्या रेशनच्या थैलींवर चिनी कम्युनिस्ट पार्टीचं चिन्ह आहे.


हेही वाचाः LPG Price Hike: घरगुती गॅस पुन्हा महागला; सर्वसामान्यांना आर्थिक फटका

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -