घरदेश-विदेशUP: योगींच्या मंत्र्यांच्या खात्यांचे वाटप, ब्रजेश पाठक बनले आरोग्यमंत्री, जितीन प्रसाद यांना...

UP: योगींच्या मंत्र्यांच्या खात्यांचे वाटप, ब्रजेश पाठक बनले आरोग्यमंत्री, जितीन प्रसाद यांना PWD, पाहा संपूर्ण यादी

Subscribe

सीएम योगी यांच्याकडे महसूल, गृह अशी मोठी मंत्रालये आहेत, तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्याकडे ग्रामीण विकासासह 6 मंत्रालये देण्यात आलीत, याशिवाय उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांच्यावर आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण या महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी सोपवण्यात आलीय.

नवी दिल्लीः UP Ministers Portfolio Distribution: उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना मंत्रिपदाचे वाटप करण्यात आलेय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गृहखाते स्वतःकडे ठेवले आहे, तर जितीन प्रसाद सार्वजनिक बांधकाम खाते सांभाळणार आहेत. सीएम योगी यांच्याकडे महसूल, गृह अशी मोठी मंत्रालये आहेत, तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्याकडे ग्रामीण विकासासह 6 मंत्रालये देण्यात आलीत, याशिवाय उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांच्यावर आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण या महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी सोपवण्यात आलीय.

योगी आदित्यनाथ (मुख्यमंत्री)

भरती, कार्मिक, गृह, दक्षता, गृहनिर्माण आणि नागरी नियोजन, महसूल, अन्न आणि नागरी पुरवठा, अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन, भूविज्ञान आणि खणिकर्म, अर्थ आणि संख्या, राज्य कर आणि नोंदणी, सामान्य प्रशासन, सचिवालय प्रशासन, संस्थात्मक वित्त, नियोजन, राज्य मालमत्ता, प्रशासकीय सुधारणा, कार्यक्रम अंमलबजावणी, पायाभूत सुविधा, नागरी विमान वाहतूक, न्याय, लष्करी कल्याण यासह 34 मंत्रालये.

केशव प्रसाद मौर्य (उपमुख्यमंत्री)

ग्रामीण विकास, ग्रामीण अभियांत्रिकी, अन्न प्रक्रिया, करमणूक कर, सार्वजनिक उपक्रम, राष्ट्रीय एकात्मता

- Advertisement -

ब्रजेश पाठक (उपमुख्यमंत्री)

वैद्यकीय शिक्षण, वैद्यकीय आणि आरोग्य, कुटुंब कल्याण आणि माता आणि बाल कल्याण

कॅबिनेट मंत्र्यांना ही खाती मिळाली

भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश कुमार खन्ना यांच्याकडे अर्थ आणि संसदीय कामकाज मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. योगींच्या पहिल्या मंत्रिमंडळातही खन्ना हे खाते सांभाळत होते. तर सूर्य प्रताप शाही यांना कृषी, कृषी शिक्षण आणि कृषी संशोधन खाते देण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्याकडे जलशक्ती आणि पूरनियंत्रण विभागाची कमान सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर बेबी राणी मौर्य यांना महिला कल्याण, बालविकास आणि पोषण खाते आणि नंदगोपाल नंदी यांना औद्योगिक विकास, निर्यात प्रोत्साहन, एनआरआय आणि गुंतवणूक प्रोत्साहन खाते मिळाले आहे. याशिवाय माजी आयएएस अधिकारी अरविंद कुमार शर्मा यांना शहरी विकास, शहरी सर्वांगीण विकास, शहरी रोजगार आणि गरिबी निर्मूलन, ऊर्जा आणि अतिरिक्त ऊर्जा स्रोत ही खाती देण्यात आली आहेत. जितीन प्रसाद योगी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचा कार्यभार सांभाळतील. योगी यांच्या मागील मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम खाते उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्याकडे होते. भाजपचा मित्रपक्ष निषाद पक्षाचे संजय निषाद यांना मत्स्यव्यवसाय खाते आणि अपना दल (एस) नेते आशिष पटेल यांना तांत्रिक शिक्षण, ग्राहक संरक्षण आणि वजन मापन खाते देण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचाः इमरान खान यांच्याविरोधात अविश्वास ठराव

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -