UP Assembly Elections 2022 : समाजवादी पार्टीचं सरकार आल्यास ५ वर्ष मोफत रेशन, अखिलेश यादव यांची घोषणा

UP Assembly Elections 2022 if Samajwadi Party comes in power will give 5 years free ration said akhilesh yadav
UP Assembly Elections 2022 : समाजवादी पार्टीचं सरकार आल्यास ५ वर्ष मोफत रेशन, अखिलेश यादव यांची घोषणा

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया ७ मार्च रोजी पूर्ण होणार आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अखिलेश यादव यांनी समाजवादी पार्टीचे सरकार आल्यास मोफत रेशन वाटप करण्यात येईल अशी घोषणा समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली आहे. अखिलेश यादव यांनी पूर्वांचलमध्ये घोषणा केली होती. तसेच यावेळी भाजपवरही निशाणा साधला होता. सातव्या टप्प्यातील मतदानापूर्वीच आता अखिलेश यादव यांनी पुन्हा ट्विट करत मतदारांना आवाहन केलं आहे.

उत्तर प्रदेश निवडणुकीचा सातवा टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडणार आहे. यापूर्वीच शनिवारी सातव्या टप्प्यातील प्रचारसंभांच्या तोफा थंडावतील. यापूर्वीच अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावरुन पुन्हा एकदा मोफत रेशनबाबत आठवण करुन दिली आहे. अखिलेश यादव यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, समाजवादी पार्टीचे सरकार आल्यास मोफत रेशन देण्यात येईल. भाजपचे लोकं तुम्हाला फक्त निवडणुकीदरम्यानच मोफत धान्य देत आहेत. सायकलचे बटन दाबा आणि ५ वर्ष मोफत रेशन मिळवा असे अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशमध्ये रेशनचा मुद्दा मोठा आहे. यामुळे राज्यातील लाखो परिवार प्रभावित होतात. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सहाव्या टप्प्यातील मतदानाच्या पूर्वी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. समाजवादी पार्टी सरकारमध्ये आल्यास मोफत रेशन देऊ आणि त्याबाबत आम्ही तयारी केली आहे. पराभव होणार असल्यामुळे भाजपची झोप उडाली आहे भाजपचे नेतेही निराश झाले आहेत. सगळ्यात मोठा पक्ष असून भाजप खोटा पक्ष आहे. यामुळे त्यांच्यापासून सावधान राहण्याची गरज असल्याचे अखिलेश यादव म्हणाले.

भाजप सरकारमध्ये शेतकऱ्यांना काहीही महत्त्व नाही. प्रत्येक धान्याच्या गोणीतून ५ किलो वजन कमी करण्यात आले आहे. दरामध्येही वाढ करण्यात आली आहे. परंतु सरकारमध्ये आल्यास प्रति गोणीमध्ये १० किलो धान्य चोरी करतील. यांच्या नेतृत्वात देशाचा विकास झाला नाही. उलट यांनी हवाई विमान आणि विमानतळसुद्धा विकले आहेत. मागील ३ वर्षांपासून मुलांच्या अभ्यासक्रमावरही परिणाम झाला आहे.


हेही वाचा : NSE Scam : चित्रा रामकृष्णा यांना CBI कोर्टाचा झटका, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला