घरताज्या घडामोडीVideo: कोणीही मुस्लिमांकडून भाजी खरेदी करू नका - भाजप आमदार

Video: कोणीही मुस्लिमांकडून भाजी खरेदी करू नका – भाजप आमदार

Subscribe

भाजपचे आमदार सुरेश तिवारी यांचा मुस्लिमांबाबत केलेल्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

देशात कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे अनेक राज्य लॉकडाऊन वाढवण्याची मागणी करत आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये आमदार लोकांना मुस्लिम विक्रत्यांकडून भाजी खरेदी करू नका, असं सांगता दिसत आहेत. उत्तर प्रदेश मधील भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश तिवारीचा यांचा हा व्हिडिओ आहे.

इंडियन एक्प्रेसच्या वृत्तानुसार, देओरिया जिल्हातील बरहज विधानसभा मतदारसंघातील आमदार सुरेश तिवारी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत काही सरकारी अधिकाऱ्यांसमवेत ते काही लोकांना सांगत आहेत की, एक गोष्ट ध्यानात ठेवा. कोणत्याही मुस्लिमांकडून भाजी खरेदी करू नका, हे तुम्हाला मी उघडपणे सांगत आहे.

- Advertisement -

बरहज विधानसभा के बीजेपी विधायक सुरेश तिवारी कह रहे हैं " कोई भी मिया के हाथ से सब्ज़ी मत लेना "

कोई भी मिया के हाथ से सब्ज़ी मत लेना "बरहज विधानसभा के बीजेपी विधायक सुरेश तिवारी कह रहे हैं " साथ में नगरपालिका गौरा बरहज के चेयरमैन उमेश सिंह भी साथ में हैं विधायक जी प्लाज्मा और ब्लड भी बहिष्कार कर देते जहालत भरी बाते कौन से मुह से करते है आपलोग ?

T.F Official ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 27, 2020

याबाबत तिवारी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, त्यांनी गेल्या आठवड्यात बरहज नगरपालिकेच्या कार्यलयात भेट दिली. त्या दरम्यान अनेक अधिकारी त्यावेळेस उपस्थित होते. ते म्हणाले की, कोरोनाचा फैलाव होण्याच्या उद्देशान समाजातील काही लोक लाळ लावून भाजीपाला विक्री करत आहेत. अशा तक्रारी ऐकल्यानंतर मी त्यांना अशा प्रकारच्या विक्रेत्यांकडून भाजीपाला खरेदी न करण्याचा सल्ला दिला. परिस्थिती स्थिर झाल्यानंतर त्यांचा उद्देश काय होता हे पाहू.

- Advertisement -

पुढे भाजपचे आमदार तिवारी म्हणाले की, मी आपला सल्ला दिला आहे. त्यामुळे लोकांवर अवलंबून असत ते पालन करतात की नाही. गेल्या महिन्यात दिल्लीच्या निजामुद्दान येथे झालेल्या तबलीगी जमात मरकजचे उदाहरण देत तिवारी म्हणाले की, जमातच्या सदस्यांनी देशासाठी काय केलं हे प्रत्येकजण पाहू शकतो.

भाजप प्रदेश प्रवक्ता राकेश त्रिपाठी म्हणाले की, पार्टीच्या या विधानाला मी समर्थन देत नाही. पक्ष याची दखल घेईल आणि तिवारी यांना कोणत्या परिस्थितीत असं भाष्य केलं याबाबत विचारेल.


हेही वाचा – केंद्र सरकारने परप्रांतीय मजुरांना घरी पाठवण्याबाबतची योजना सांगा – सर्वोच्च न्यायालय


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -