घरताज्या घडामोडीयूपी पोटनिवडणूक: विधानसभेच्या ७ जागांवर मतदान सुरू

यूपी पोटनिवडणूक: विधानसभेच्या ७ जागांवर मतदान सुरू

Subscribe

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली.

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या ७ जागांवर आज पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. ज्यामध्ये पश्चिम उत्तर प्रदेशचे फिरोजाबादच्या टूंडला, अमरोहाचा नौगांव, कानपूर नगरातील घाटमपूर, उन्नावरचा बांगरमऊ, जौनपुरमधील मल्हनी आणि देओरिया यासह बुलंदशहर या सात मतदारसंघात मतदान होत आहे. याचा निकाल १० नोव्हेंबरला लागणार आहे.

उत्तर प्रदेशच्या या सात जागांवरील पोटनिवडणूक ही भाजपा सरकारसाठी परीक्षा मानली जात आहे. दरम्यान कोरोना व्हायरसमुळे पोटनिवडणुकीसाठी मोठी व्यवस्था केले गेली आहे. कर्मचाऱ्यांसाठी यावेळी पीपीई कीट, अधिक मतदान केंद्र, थर्मल स्क्रीनिंग, सॅनिटायजर देण्यात आले असून तर मतदार मास्क, हँडलोज आणि सोशल डिस्टन्सिंग पालन करून मतदान करत आहेत. कोरोनाच्या संकट काळात काळजीपूर्वी मतदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.

- Advertisement -

भाजपाचे आमदार जन्‍मेजय सिंह यांच्या अकाली निधनानंतर देओरियाची जागा रिक्त आहे. दरम्यान सपाचे नेते ब्रह्माशंकर त्रिपाठी, काँग्रेसचे मुकुंद भास्कर मणि त्रिपाठी, बसपाचे अभयनाथ त्रिपाठी आणि भाजपचे डॉक्टर सत्य प्रकाश मणि त्रिपाठी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर जौनपुरच्या मल्हानी जागा माजी कॅबिनेट मंत्री आणि सपा नेते पारसनाथ यादव यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे.

- Advertisement -

अमरोहमधील नौगांव सादात जागा रिक्त झाल्यावर कॅबिनेट मंत्री चेतन चौहान यांच्या अचानक निधनानंतर पोटनिवडणूक होत आहे. येथे सर्व राजकीय पक्षांनी आपले उमेदवार उभे केले आहेत आणि भाजपने चेतन चौहतान यांची पत्नी संगीता चौहान यांना आपले उमेदवार केले आहे.

दरम्यान कुलदीपसिंह सेंगर हे बांगरमऊ विधानसभा जागेवर भाजपकडून आमदार म्हणून निवडून आले होते. पण माखी बलात्कार प्रकरणात दोषी ठरल्यामुळे तेव्हा त्यांना सदस्यत्व मागे घेण्यात आले. बांगरमऊ पोटनिवडणुकीत एकूण ११ उमेदवार आहेत. त्याचबरोबर बुलंदशहर सदर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. १८ उमेदवारांपैकी केवळ ५ उमेदवार अपक्ष आहेत तर १३ उमेदवार पक्षांचे आहेत.

कानपुरमधील घाटमपूर विधानसभेची जागा भाजपकडे होते. येथील आमदार कमल राणी वरुण यांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर ही विधानसभा पोटनिवडणुकीतमध्ये आली. २०१७च्या निवडणुकीत एसपी सिंह बघेल यांना तुंडला विधानसभा येथून सुमारे ३८ हजार मतांनी विजय मिळविला. या जागेवरही मतदान होत आहे.


हेही वाचा – रामविलास पासवान यांच्या मृत्यूमागे षडयंत्र; बिहारचं राजकारण तापलं


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -