घर देश-विदेश मुझफ्फरनगर शाळेतील मारहाण प्रकरणी फॅक्ट चेकर मोहम्मद झुबेरवर गुन्हा दाखल; जाणून घ्या...

मुझफ्फरनगर शाळेतील मारहाण प्रकरणी फॅक्ट चेकर मोहम्मद झुबेरवर गुन्हा दाखल; जाणून घ्या कारण

Subscribe

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील एका शाळेतील मुलाला त्याच्याच वर्गमित्राकडून चोप देण्यात आल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. आता या प्रकरणी ऑल्ट न्यूजचे पत्रकार झुबेरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित बालकाची ओळख उघड केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला असून मुलांचे संरक्षण आणि काळजी कायद्याच्या कलम 74 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील एका शाळेतील मुलाला त्याच्याच वर्गमित्राकडून चोप देण्यात आल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. आता या प्रकरणी ऑल्ट न्यूजचे पत्रकार झुबेरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित बालकाची ओळख उघड केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला असून मुलांचे संरक्षण आणि काळजी कायद्याच्या कलम 74 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष्णुदत्त नावाच्या व्यक्तीच्या तक्रारीवरून मनसुपूर पोलीस ठाण्यात झुबेरविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (UP Case registered against fact checker Mohammad Zubair in Muzaffarnagar school beating case Trupti Tyagi)

विष्णुदत्त यांनी Alt न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद झुबेर यांच्यावर एका मुस्लिम मुलाची शाळेत मारहाण केल्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये पीडित मुलाची ओळख उघड केल्याचा आरोप केला आहे. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, “ओळख उघड करून बाल न्याय कायद्यांतर्गत मुलाच्या हक्कांचे उल्लंघन केले गेले आहे.”

काय प्रकरण आहे?

- Advertisement -

मुझफ्फरनगरमधील एका खासगी शाळेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एक महिला शिक्षिका कथितरित्या इतर विद्यार्थ्यांना मुस्लिम विद्यार्थ्याला चोप देण्यास सांगितले दिसत होते. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर हे प्रकरण चांगलच गाजलं आणि राजकीय पक्षांनी योगी सरकारला घेरलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही भाजपवर निशाणा साधला. त्याचवेळी, या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ देखील मोहम्मद झुबेरने सोशल मीडिया साइट X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केला आहे.

झुबेरच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये काय?

25 ऑगस्ट रोजी, झुबेरने पीडित मुलाच्या वडिलांबद्दल एक ट्विट केले, ज्यामध्ये मुलाच्या वडिलांनी या प्रकरणात शिक्षकाविरुद्ध पोलीस तक्रार न करण्याचा निर्णय घेतला होता. झुबेरच्या ट्विटमुळे त्या व्यक्तीची ओळखच नाही तर त्याच्या अल्पवयीन मुलाचीही ओळख उघड झाली. मात्र, काही तासांनंतर झुबेरने व्हिडिओ काढून टाकला होता.

- Advertisement -

विशेष म्हणजे, मुझफ्फरनगरच्या खब्बूपूर गावात असलेल्या नेहा पब्लिक स्कूलचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये शिक्षिका तृप्ती त्यागी यांनी गृहपाठ न केल्यामुळे एका मुस्लीम मुलाला त्याच्याच वर्गमित्रांकडून चोप दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणाने पेट घेतल्यानंतर संबंधित शिक्षिकेवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा: क्लास बंक केल्याची शिक्षा टाळण्यासाठी 3 मुलींनी रचली अशी कहाणी की उडाली खळबळ; नेमकं घडलं काय?)

- Advertisment -