जोरदार बर्फवृष्टीमुळे केदारनाथमध्ये योगी आदित्यनाथ आणि त्रिवेंद्र सिंह रावत अडकले

Up CM Yogi and Uttarakhand Chief Minister Trivendra Singh Rawat Trapped in Kedarnath Due to Heavy Snowfall
जोरदार बर्फवृष्टीमुळे केदारनाथमध्ये योगी आदित्यनाथ आणि त्रिवेंद्र सिंह रावत अडकले

केदारनाथमधील जोरदार झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत अडकले आहेत. हवामानात सुधारणा झाल्यानंतर दोघेही बद्रीनाथ धामकडे रवाना होणार आहेत. आज सकाळी योगी आदित्यनाथ आणि त्रिवेंद्र सिंह रावत केदारनाथ धाम येथे पोहोचले होते. सोमवारी सकाळी केदारनाथचे द्वार बंद होण्याच्या प्रक्रियेचे हे दोघे साक्षी होते. पण यादरम्यान झालेल्या बर्फवृष्टीचा योगी आदित्यानाथ यांनी आनंद लुटला.

पोलीस अधीक्षक नवनीत सिंह भुल्लर यांनी सांगितले की, ‘खराब हवामानामुळे आता मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ थांबले आहेत. हवामानात सुधारणा झाल्यानंतर बदरीनाथ धामकडे रवाना होतील.’

आज सकाळी ५.३० वाजता भाऊबीजवर दिवशी केदारनाथ धामच्या गर्भगृहातील दरवाजे कायदेशीर पद्धतीने बंद करण्यात येतात. परंतु यावर्षी सतत होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे बाहेरी दरवाजे बंद करण्यासाठी आणि पालखी प्रस्थान करण्यासाठी विलंब झाला. ८.३० वाजता केदारनाथचे सर्व दरवाजे बंद झाले. यावेळी उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत, कॅबिनेट मंत्री मदन कौशिक आणि राज्यमंत्री धन सिंह रावत यावेळी उपस्थित होते.

बर्फवृष्टीमुळे संपूर्ण केदारनाथ मंदिर परिसरात पांढरा कापूस पसरल्यासाखा दिसून येते आहे. येथे मोठ्या प्रमाणात थंडीचे प्रमाण वाढली आहे. गंगोत्री धाम इथेही मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. गंगोत्री धामचे द्वारे बंद झाल्यावर अचानक वातावरणात बदल होऊन बर्फवृष्टी होण्यास सुरुवात झाली.