घरदेश-विदेशउत्तरप्रदेश धर्मांतरण रॅकेटचा दहशहवादी संघटनेशी संबंध, ATS च्या तपासात माहिती उघड

उत्तरप्रदेश धर्मांतरण रॅकेटचा दहशहवादी संघटनेशी संबंध, ATS च्या तपासात माहिती उघड

Subscribe

उत्तरप्रदेशमधील धर्मांतरण रॅकेटप्रकरणी अटक केलेल्या आरोपी उमर गौतमचे अल हसन एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटीशी संबंध असल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले आहे. एटीएसने मलिहाबादमधील अल हसन सोसायटीवर छापा टाकला. परंतु या तपासादरम्यान सोसायटीच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेली माहिती प्रत्यक्षात खोटी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आता एटीएसकडून दहशतवादी संघटनांशी या सोसायटी संबंध तर नाही या अँगलने तपास सुरु आहे. कारण एसटीएसला तपासामध्ये दहशतवादी संघटनेशी संबंधीत काही पुरावे हाती लागले आहेत.

आरोपी उमर गौतम हा जिस अल हसन एज्युकेशनल सोसायटीशी संबंधीत आहे. या वेबसाईटच्या अधिकृत वेबसाईटवर लिहिण्यात आले आहे की, ही सोसायटी हरदोईच्या रसूलपुर आठ गावात मुलींसाठी शाळा चालवते. तसेच लखनऊमधील मलिहाबादमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत सीबीएसई शाळा चालवते. त्याचप्रमाणे लखनऊच्या शाळेतील ५०० मुलांसाठी मोफत वसतिगृह सुविधा देण्यात आल्या आहेत. परंतु एटीएसच्या छापेमारीत सर्व गोष्टी खोट्या, बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे.

- Advertisement -

एटीएसच्या तपासात, हरदोईच्या रसूलपूर गावात अल हसन सोसायटीची कोणतीही शाळा नसल्याचे आढळले. तसेच लखनउच्या मलिहाबादमध्ये अल हरम अकॅडमी आढळली, परंतु त्याठिकाणी मदरसा चालविला जात होती. याखेरीज सीबीएसई शाळा किंवा ५०० मुलांसाठी मोफत चालविले जाणारे कोणतेही वस्तीगृह एटीएसला आढळले नाही. त्यामुळे या सोसायटीच्या माध्यमातून बनावट माहिती देत धर्मांतरणासंबंधीत तसेच दहशतवादी संस्थांसाठी काम केला जात असल्याचा दाट संशय एटीएसने व्यक्त केला आहे.

दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची शक्यता

उत्तरप्रदेश धर्मांतरण रॅकेटचा तपास करणाऱ्या तपास यंत्रणांना आता या रॅकेटचा दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे काही पुरावे मिळाले आहेत. यासह तपास यंत्रणांना रॅकेटला पुरवला जाणारा परदेशी निधी आणि दहशतवादी संघटनांकडून मिळणारा निधीसंबंधीत काही पुरावे हाती लागले आहेत. दरम्यान या मुकबधिर मुलांचे धर्मांतर करून त्यांचा जिहादी कार्यात वापर केल्याची माहितीही समोर आली आहे. तसेच या रॅकेटचा देशविरोधी कार्यात सहभाग असल्याचा पुरावाही आता समोर आला आहे.

- Advertisement -

या धर्मांतरण रॅकेटचा मास्टरमाइंड श्याम सिंह उर्फ ​​उमर गौतम याने देशातील २४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील अनेक नागरिकांचे जबरदस्तीने धर्मांतरण केले आहे. याचा पुरावाही तपास यंत्रणांना मिळाला आहे. आरोपी गौतम यानेहिंदू, ख्रिश्चन, जैन आणि शीख कुटुंबातील मोठ्या संख्येने मुलांना धर्मांतर केलेचं पण विशेषत: मुकबधिर मुलांना सर्वाधिक लक्ष्य केले. या मुलांना वेगवेळ्या तंत्राने शिकवण्यासाठी या रॅकेटने शिक्षकांची टोळी तयार केली होती. या टोळीच्या माध्यमातून धर्मांतराचा पाया घातला जात होता.

झाकीर नाईक कनेक्शन

सूत्रांच्या माहितीनुसार, धर्मांतर प्रकरणातील आरोपी उमर गौतमचे झाकीर नाईकच्या संस्थेतील लोकांशीही संबंधित होता. आरोपी गौतम हा झाकीर नाईकची संस्था इस्लामिक रिसर्च फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता. तसेच या फाउंडेशनशी संबंधित वकील फैज सय्यद याच्यांशी उमर गौतमचे संबंध होते. सूत्रांच्या माहितीनुसार, झाकीर नाईकची आयआरएफ ही संघटना बंदीपूर्वी या धर्मातरण रॅकेटला अर्थसहाय्य करत होती. त्याचबरोबर उमर गौतम इस्लामिक युवा महासंघाच्या बर्‍याच लोकांशी संपर्कात होता.

आयएसआय कनेक्शन

धर्मांतरण रॅकेटचे धागेदोरे आता पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधीत असल्याने यूपी एटीएस तपास यंत्रणा आता दहशतवादी अंगाने तपास करत आहे. यूपी एटीएसने दहशतवादी संघटनेसंदर्भात गुप्तचर संस्थांशी संपर्क साधला आहे. वास्तविक या दहशतवादी संघटनेने एप्रिलमध्ये पाकिस्तानमध्ये एक विशेष अभियान तयार केले होते. याचा उद्देश धार्मिक कट्टरता पसरवणे आणि धर्मांतरणाला चालना देणे हा होता. त्यासाठी त्यांनी नियोजन केले होते. या अभियानाची सुरुवात डासना मंदिरातूनच होणार होती. परंतु या अभियानाची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आणि हे अभियान यशस्वी झाले नाही. या रॅकेटचे धागेदोरे आता दहशतवादी संघटनेशी जोडले गेले आहेत की नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मुख्यमंत्री स्वत: लक्ष ठेवून 

या धर्मांतरण रॅकेटचा खुलासा झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वत: या प्रकरणाच्या तपासावर नजर ठेवून आहेत. सीएम योगी यांनी तपास यंत्रणांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, जे लोक देशाच्या सुरक्षा आणि श्रद्धेविरूद्ध षडयंत्र रचतात त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे.


शबाना आझमी यांना घरपोच मद्य मागवणं पडलं महाग


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -