घरक्राइमUP Crime News : दोन बालकांची हत्या करणारा साजिद मनोरुग्ण, दुसऱ्या आरोपीने...

UP Crime News : दोन बालकांची हत्या करणारा साजिद मनोरुग्ण, दुसऱ्या आरोपीने दिली माहिती

Subscribe

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या बदायूंमध्ये दोन बालकांची निर्घृण हत्या प्रकरणाील मुख्य आरोपी साजिदचा भाऊ जावेदने बरेलीमध्ये पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याने दिलेल्या माहितीनुसार साजिद हा मनोरुग्ण होता. लहानपणापासूनच तो आजारी असायचा, असे त्याने सांगितले.

हेही वाचा – Lavasa Project : वादग्रस्त लवासा प्रकल्प विकत घेणाऱ्या व्यक्तीच्या कंपन्या ईडीच्या रडारवर

- Advertisement -

बदायूं येथील बाबा कॉलनीत मंगळवारी रात्री 8च्या सुमारास विनोद ठाकूर यांच्या आयुष (13) आणि आहान (6) या मुलांची हत्या झाली. विनोद यांच्या घराशेजारीच केशकर्तनाचा व्यवसाय करणारे साजिद आणि जावेद या भावांनी हे हत्याकांड घडवले. साजिदचे पीडित कुटुंबाकडे येणे-जाणे होते. ते दोघे नेहमी आठ-साडेआठ वाजण्याच्या सुमारास दुकानात येत असे. त्यादिवशीही दोघेही त्याच वेळी आले, साजिद गपचूप होता. पण 10 वाजता साजिदने त्याला काही त्रास होत असल्याचे सांगितले. त्यानंतर डॉक्टरकडे जात असल्याचे सांगत तो दुकानातून 1.30च्या सुमारास बाहेर पडला, अशी माहिती जावेदने दिली.

साजिद लहानपणापासूनच आजारी असायचा. त्याच्या वडिलांनी त्याला पीर आणि इतर अनेक ठिकाणी नेले होते. जेव्हा त्याला खूप त्रास व्हायचा तेव्हा, तो खूप आक्रमक व्हायचा. जावेदने सांगितले की, आक्रमक झाल्यानंतर त्याने एकदा उंदीर मारण्याचे विष प्राशन केले होते, अशी माहितीही जावेदने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : अभिनेता गोविंदा निवडणुकीच्या रिंगणात? मुख्यमंत्री शिंदे देणार उमेदवारी

मंगळवारी (19 मार्च) संध्याकाळी 05.30च्या सुमारास जावेदने साजिदच्या हातात चाकू पाहिला. हा चाकू त्याने कुठून विकत घेतला होता, याची माहिती पोलिसांनी घेतली. चिकन कापण्यासाठी तो खरेदी केल्याचे त्याने जावेदला सांगितले. त्यानंतर कंत्राटदार विनोद ठाकूर यांच्या घरी साजिद गेला आणि टेरेसवर त्याचे कपडे रक्ताने माखलेले दिसल्यावर जावेद घाबरला. त्यानंतर साजिद आणि जावेद तेथून पळून गेले. पण त्याच दिवशी साजिदचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. साजिद एकटाच विनोद ठाकूर यांच्या घरात गेला होता, मी खाली उभा होतो, असे जावेदचे म्हणणे आहे. जावेदला परिसरात पाहिल्याचे आसपासच्या लोकांनी सांगितले.

साजिदच्या वैवाहिक जीवनात देखील समस्या होत्या, त्याची मुले जन्मानंतर लगेचच मरण पावली. त्यामुळे तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता. साजिदला खरंच काही आजार होता का? याचा तपास पोलीस करत आहेत. अद्यापही या हत्यांमागचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.

हेही वाचा – Manoj Jarange : मला तडीपार करण्याचा प्रयत्न, पण गृहमंत्रीसाहेब…, जरांगेंचा फडणवीसांना इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -