घरCORONA UPDATEलॉकडाऊन- या जिल्ह्यात घराघरात 'कंडोम'चे वाटप

लॉकडाऊन- या जिल्ह्यात घराघरात ‘कंडोम’चे वाटप

Subscribe

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे कोरोनाचे गांभीर्य लोकांना समजावे यासाठी पोलीस, डॉक्टर, आरोग्य संघटना व लोकप्रतिनिधी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करत आहे. याचदरम्यान, उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यात मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या जनजागृतीबरोबरच लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी घराघरात कंडोम व गर्भनिरोधक गोळ्यांचे वाटप करावे लागत असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत ३० हजार कंडोम येथील वस्त्यांमध्ये वाटण्यात आले आहेत.

लॉकडाऊन असल्याने सध्या सगळेच घरी आहेत. घराबाहेर पडण्यास परवानगी नसल्याने नागरिक कुटुंबीयांसमवेत वेळ घालवत आहेत. परराज्यात असलेले मजूरही गावी कुटुंबाकडे आले आहेत. यामुळे लॉकडाऊननंतर लोकसंख्या वाढण्याची शक्यताही वाढली आहे. जी सद्यपरिस्थितीत देशाला परवडणारी नाहीये. यामुळेच कंडोम व गर्भनिरोधक गोळ्यांचे वाटप करण्यात येत असल्याचे व याआधीही असे वाटप करण्यात आल्याचे येथील आरोग्य विभागाचे डॉक्टर वीरेंद्र प्रसाद यांनी सांगितले आहे. लॉकडाऊनमुळे मनोरंजनाचे साधन उपलब्ध नाहीत. यामुळे लोकसंख्या वाढण्याची शक्यता असल्याचे प्रसाद यांनी म्हटले आहे.

2 प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -