घरAssembly Battle 2022UP Election 2022 : शेवटच्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस; काशीमध्ये PM...

UP Election 2022 : शेवटच्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस; काशीमध्ये PM मोदींचा रोड शो; दिग्गजांची ताकद पणाला

Subscribe

रोड शोदरम्यान एका चहाच्या स्टॉलला भेट देऊन पंतप्रधानांनी चहाची चुस्कीही घेतली. तसेच वाराणसीमध्ये आपला रोड शो संपवताना पंतप्रधानांनी विजयाचे संकेत दिले.

UP 7th Phase Election : उत्तर प्रदेश निवडणुकीच्या रणसंग्रामात मतदानाचा फक्त एक टप्पा शिल्लक आहे. त्यासाठी आज निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. 7 मार्चला याठिकाणी मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्ष पूर्ण ताकदीने प्रचारात उतरले आहेत. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी गेल्या दोन दिवसांपासून काशीत तळ ठोकून आहेत. शुक्रवारी पंतप्रधान मोदींनी वाराणसीत रोड शो केला. तर आजही ते वाराणसीमध्ये मोठ्या जमसभेला संबोधित करणार आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या सातव्या अर्थात शेवटच्या टप्प्यातील 54 जागांपैकी चकिया, रॉबर्टसगंज आणि दुड्डी येथे 4 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे. तर उर्वरित 51 जागांवरील प्रचार संध्याकाळी 6 वाजता संपेल.

- Advertisement -

दिग्गजांची ताकद पणाला

पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी मेगा रोड शो केला, तर अखिलेश यादव यांनीही त्याचवेळी मेगा शो करून त्यांना आपली ताकद दाखवून दिली. बसपाच्या सुप्रीमो मायावतीही शेवटच्या टप्प्यात प्रचारासाठी उत्साहात आहेत. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी देखील उत्तर प्रदेश निवडणुकीत यंदा काँग्रेसची सत्ता स्थापन करण्यासाठी कंबर कसली आहे. याशिवाय काँग्रेसच्या  आज निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच नेत्यांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात सर्वच पक्ष पूर्ण जोशात प्रचार सभा, रॅली आणि भव्य रोड शो घेत आहेत.

पंतप्रधान मोदींचा मेगा रोड शो

आदल्या दिवशी काशीच्या रस्त्यावर पीएम मोदींनी सुमारे तीन किलोमीटरचा मेगा रोड शो केला. उत्तर विधानसभा मतदारसंघातून सुरु झालेला हा रोड शो दक्षिण विधानसभा मतदार संघात येऊन संपला. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पीएम मोदींच्या रोड शोमध्ये भाजप समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. पंतप्रधानांनीही सर्वांना हात जोडून अभिवादन केले. पंतप्रधान मोदींनी सरदार पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. सरदार पटेल चौरस्त्यावरून पंतप्रधान मोदींच्या रोड शोला सुरुवात झाली.

- Advertisement -

चहाच्या स्टॉलवर मोदींनी घेतला चहाचा आस्वाद

रोड शोदरम्यान एका चहाच्या स्टॉलला भेट देऊन पंतप्रधानांनी चहाची चुस्कीही घेतली. वाराणसीमध्ये आपला रोड शो संपवताना पंतप्रधानांनी विजयाचे संकेत दिले. बनारस हिंदू विद्यापीठातील पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्यालाही त्यांनी पुष्पहार अर्पण केला. विशेष म्हणजे पीएम मोदींच्या रोड शोमध्ये मुस्लिम समाजातील लोकही खूप उत्साही होते. त्याचवेळी पंतप्रधानांच्या या रोड शोमध्ये जमलेल्या गर्दीमुळे भाजप खूपच उत्साहित दिसत आहे.


Fuel Price Today : 10 दिवसांत पेट्रोल-डिझेल 12 रुपयांनी महागणार! आजचा दर काय?

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -