घरAssembly Battle 2022UP Election 2022 Live Update : उत्तर प्रदेशमध्ये मतदानाच्या सातव्या टप्प्यात दुपारी...

UP Election 2022 Live Update : उत्तर प्रदेशमध्ये मतदानाच्या सातव्या टप्प्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 35.51 टक्के मतदान

Subscribe

उत्तर प्रदेशमध्ये मतदानाच्या सातव्या टप्प्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 35.51 टक्के मतदान

- Advertisement -

उत्तर प्रदेशमध्ये मतदानाच्या सातव्या टप्प्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 21.55 टक्के मतदान

- Advertisement -

आझमगमधील एक वृद्ध जोडपं ट्रॉलीतून मतदान केंद्रावर पोहोचले आहेत.


उत्तरप्रदेशमध्ये मतदानाच्या सातव्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 8.58 टक्के मतदान


यूपीत विधानसभा निवडणुकांचा आज अंतिम टप्पा, 9 जिल्ह्यांतील 54 जागांवर मतदान सुरू

उत्तरप्रदेशमध्ये सोमवारी म्हणजेच आज सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होत आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीसह उत्तर प्रदेशातील 9 जिल्ह्यांतील 54 विधानसभा जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात 2 कोटींहून अधिक मतदार 613 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झाले आहे.

निवडणुकीच्या या टप्प्यात माजी मंत्री दारा सिंह चौहान, सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर, मुख्तार अन्सारी यांचा मुलगा अब्बास अन्सारी, भाजपमधून समाजवादी पक्षात दाखल झालेले धनंजय सिंह यांचे भवितव्य पणाला लागले आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सहा टप्प्यातील मतदान आधीच पूर्ण झाले आहे. उत्तरप्रदेश निवडणुकीचे निकाल 10 मार्चला लागणार आहेत.


यूपी निवडणुकीवर पंतप्रधान मोदींचे ट्विट

उत्तर प्रदेशातील लोकशाहीच्या महान बलिदानाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. मी सर्व मतदारांना विनंती करतो की, विधानसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात पूर्ण उत्साहाने सहभागी होऊन मतदानाचा नवा विक्रम करा.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -