घरताज्या घडामोडीUP Election 2022 : तिकिटासाठी नव्हे तर राष्ट्रवादासाठी भाजपमध्ये प्रवेश, अपर्णा यादव...

UP Election 2022 : तिकिटासाठी नव्हे तर राष्ट्रवादासाठी भाजपमध्ये प्रवेश, अपर्णा यादव यांचे वक्तव्य

Subscribe

भारतीय जनता पक्षाच्या विचारांमुळेच आज मी या पक्षाचा भाग आहे. असे अपर्णा यादव यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांची छोटी सून अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यावरुन अनेक चर्चा रंगल्या होत्या. भाजपमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी प्रवेश केला असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता. परंतु या चर्चांना अपर्णा यादव यांनी पूर्णविराम दिला आहे. भाजपमध्ये प्रवेश तिकिटासाठी नाही तर राष्ट्रवादासाठी केला असल्याचे वक्तव्य अपर्णा यादव यांनी केले आहे. मुलायम सिंह यादव माझे वडील आहेत त्यांचा आशीर्वाद घतेला असल्याचेही अपर्णा यादव म्हणाल्या आहेत.

अपर्णा यादव यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की, राष्ट्रवादामुळे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. देशाला विकासाच्या वाटेवर नेण्यासोबतच देशातील मूल्ये जपण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या संकल्पनेत रंग भरण्याचे काम करेल असे अपर्णा यादव म्हणाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या विचारांमुळेच आज मी या पक्षाचा भाग आहे. असे अपर्णा यादव यांनी सांगितले.

- Advertisement -

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांची धाकटी सून अपर्णा यादव यांच्या भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या चर्चांवर अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अपर्णा यादव यांनी मुलायम सिंह यांचा आशीर्वाद घेतल्याच्या व्हायरल फोटोतून राजकीय संदेश काढण्याच्या भाजपच्या रणनीतीवर अखिलेश यादव म्हणाले की, हे काम आम्हीही करू शकलो असतो. आम्ही इतर कुटुंबातील सदस्यांनाही घेऊन जाऊ शकलो असतो, पण आम्ही तसे केले नाही. वास्तविक भाजपचे काम कुटुंबात कलह निर्माण करणे, समाजात तेढ निर्माण करणे आहे.


हेही वाचा : ऐतिहासिक! स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पाकिस्तानी प्रवासी हवाई मार्गाने येणार भारतात

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -