घरदेश-विदेशयूपीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, प्रियंका गांधींच्या सल्लागाराची पक्षाला सोडचिठ्ठी

यूपीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, प्रियंका गांधींच्या सल्लागाराची पक्षाला सोडचिठ्ठी

Subscribe

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींच्या कँपमध्ये सध्या उलथापालथ होताना दिसत आहे. प्रियंका गांधींचे सल्लागार हरेंद्र मलिक आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पंकज मलिक यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. पिता-पुत्र हे पश्चिम यूपीतील शक्तिशाली जाट नेते आहेत. गेल्या आठवड्यात प्रियंका गांधींनी पंकज मलिक यांची निवडणूक रणनीती आणि नियोजन समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती केली होती.

मात्र, त्यांनी आता पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. हरेंद्र मलिक खासदार राहिले आहेत तर त्यांचे पुत्र पंकज मलिक दोन वेळा काँग्रेसचे आमदार राहिले आहेत. दोन्ही नेते लवकरच समाजवादी पक्षात प्रवश करणार असल्याची चर्चा आहे. मलिक कुटुंब हे मुझफ्फरनगरचे रहिवासी आहेत. २२ ऑक्टोबर रोजी अखिलेश यादव तिथे रॅली काढणार आहेत. हरेंद्र आणि पंकज मलिक त्या दिवशी अखिलेश यादव यांच्यासोबत एकाच मंचावर असू शकतात अशी माहिती आहे.

- Advertisement -

काँग्रेस पक्षातून राजीनामा दिल्यानंतर, हरेंद्र मलिक यांनी प्रियंका गांधी यांच्या जवळच्या लोकांवर पक्ष हायजॅक केल्याचा आरोप केला. प्रियंका गांधी १७ ऑक्टोबरपासून सहारनपूर येथून प्रतिज्ञा यात्रा सुरू करणार होत्या. परंतु स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या पाठिंब्याअभावी हा कार्यक्रम सुरू होऊ शकला नाही. सहारनपूरमधील काँग्रेस नेते इम्रान मसूदही पक्ष सोडू शकतात अशी चर्चा आहे. यूपीमध्ये फक्त समाजवादी पक्षच भाजपला पराभूत करू शकतो असं अनेकांचं मत आहे. हरेंद्र आणि पंकज मलिक यांचे काँग्रेसमधून बाहेर पडणे पक्षासाठी मोठा धक्का आहे.

हरेंद्र मलिक यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात चौधरी अजित सिंह यांच्यापासून केली. तेव्हा ते जनता दलात होते. मलिक १९८९ मध्ये जनता दलाच्या तिकिटावर खतौनी येथून पहिल्यांदा आमदार झाले. यानंतर, ते मुजफ्फरनगरच्या बाघरा मतदारसंघातून लोक दलाचे आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर ते समाजवादी पक्षात गेले. तिथून ते इंडियन नॅशनल लोक दलाकडून हरियाणातून राज्यसभा खासदार झाले. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -