घरAssembly Battle 2022UP Election 2022 : यूपीमध्ये चौथ्या टप्प्यात 59 जागांवर मतदान, योगी सरकारमधील...

UP Election 2022 : यूपीमध्ये चौथ्या टप्प्यात 59 जागांवर मतदान, योगी सरकारमधील अर्ध्या डझनांपेक्षा अधिक मंत्री मैदानात

Subscribe

लखनऊच्या केंट जागेवर भाजपकडून बृजेश पाठक यांना उतरवण्यात आले आहे. ते योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. सपाकडून राजू गांधी यांना उमेदवारी दिली आहे. बसपाने ब्राम्हण व्यापारी अनिल पांडेला तर काँग्रेसने सिख समुदायाचे दिलप्रीत सिंह विर्क मैदानात आहेत.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाले असून बुधवारी चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या फेजमध्ये सूबेची राजधानी लखनऊ आणि रायबरेली जिल्ह्यासह एकूण 9 जिल्ह्यांमध्ये 59 जागांवर 624 उमेदवार रिंगणात आहेत. उत्तर प्रदेशमधील योगी सरकारमधील अर्धा डझनपेक्षा जास्त नेते निवडणूक लढवत आहेत. भाजप नेत्यांची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे. सपा, बसपा आणि काँग्रेसमधील बडे नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

लखनऊ भाजपचा मजबूत गढ असल्याचे सांगितले जाते. 1991 पासून 2017 भाजप या ठिकाणी पराभव मिळवत आली आहे. भाजपकडून आशुतोष टंडन पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत. तर सपाकडून अनुराग भदौरिया यांना उतरवण्यात आले आहे. काँग्रेसकडून विद्यार्थी नेते मनोज तिवारी आणि बीएसपीने आशीष सिन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. लखनऊच्या केंट जागेवर भाजपकडून बृजेश पाठक यांना उतरवण्यात आले आहे. ते योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. सपाकडून राजू गांधी यांना उमेदवारी दिली आहे. बसपाने ब्राम्हण व्यापारी अनिल पांडेला तर काँग्रेसने सिख समुदायाचे दिलप्रीत सिंह विर्क मैदानात आहेत.

- Advertisement -

सरोजनी नगर सीटवर सगळ्यांची नजर

लखनऊनची बहू चर्चित जागा असलेल्या सरोजनी नगर जागेवर सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. भाजपने या जागी सीटींग आमदार स्वाति सिंहचे तिकीट कापले असून ईडीचे अधिकारी राहिलेल्या राजेश्वर सिंह यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर सपाने पूर्ण मंत्री अभिषेक मिश्रांना उमेदवारी देण्यात आली आहे. येथील निवडणूक चांगलीच चुरशीची ठरणार आहे. काँग्रेसकडून बबलू सिंह तर बसपाने जलीस खान यांना रिंगणात उतरवलं आहे. मुस्लिम आणि दलित वोट बँकेसाठी बसपा मैदानात उतरली आहे. तर सपाने यादव-ब्राम्हण-मुस्लिम समीकरणाच्या आधारावर उमेदवार दिला आहे. भाजपने या जागेवर ठाकुर आणि शहरी मतदारांच्या आधारावर विजयाचा दावा केला आहे. राजेश्वर सिंह आणि अभिषेक मिश्रा यांच्यामुळे ब्राम्हण विरुद्ध ठाकूर असे राजकीय वर्चस्व पाहायला मिळत आहे.

रायबरेलीच्या जागेवर अदिती सिंह यांना आव्हान

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा गढ मानला जाणाऱ्या रायबरेली जिल्ह्यातील पाच जागांवर निवडणूक होणार आहे. रायबरेलीच्या सदर विधानसभा जागेवर भाजपकडून अदिती सिंह यांना उमेदवारी देण्यात आली असल्याने प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांचे वडील काँग्रेसकडून १९९३ ते २०१७ पर्यंत लगातार आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१७ मध्ये अदिती यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक जिंकली होती. परंतु यंदा भाजपच्या तिकीटावर या जागेवर निवडणूक लढवत आहेत. अदिती सिंहसमोर समाजवादी पार्टीचे उमेदवार आरपी यादव आहेत. तर काँग्रेसकडून या जागेवर मनीष चौहाना यांना उतरवण्यात आले आहे. बसपाने मोहम्मद अशरफ यांना उमेदवारी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : UP Election 2022 : गोव्यानंतर आदित्य ठाकरे उत्तर प्रदेशात घेणार सभा, सेनेचे 37 उमेदवार रिंगणात

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -