घरदेश-विदेशUP Election Result 2022: योगींना हायकमांड देणार यूपीच्या विजयाचं गिफ्ट; बीजेपी संसदीय...

UP Election Result 2022: योगींना हायकमांड देणार यूपीच्या विजयाचं गिफ्ट; बीजेपी संसदीय बोर्डाचे सदस्य होणार

Subscribe

योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू यूपीमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार यूपीमध्ये भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे. आतापर्यंत 403 पैकी 399 जागांवर आलेल्या ट्रेंडनुसार भाजप 274 जागांवर आघाडीवर आहे.

नवी दिल्लीः उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत कलांचं रुपांतर निकालात झाले, तर हायकमांड योगी आदित्यनाथ यांची पक्षातील उंची वाढवू शकते. योगी आदित्यनाथ यांना भाजपच्या संसदीय मंडळाचे सदस्य केले जाऊ शकते. होळीच्या आसपास भाजप अध्यक्ष जेपी नड्डा संसदीय मंडळाची पुनर्रचना करतील, ज्यामध्ये योगी आदित्यनाथ यांचा बोर्डात समावेश केला जाऊ शकतो. योगी आदित्यनाथ यांचा पक्षात दबदबा सातत्याने वाढत आहे. 18-20 मार्चच्या सुमारास त्याची घोषणा केली जाऊ शकते.

योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू यूपीमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार यूपीमध्ये भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे. आतापर्यंत 403 पैकी 399 जागांवर आलेल्या ट्रेंडनुसार भाजप 274 जागांवर आघाडीवर आहे. अशा स्थितीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. त्याचवेळी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे प्रत्येक प्रयत्न फोल ठरताना दिसत आहेत. काँग्रेसची कामगिरी पुन्हा एकदा अत्यंत निराशाजनक आहे.

- Advertisement -

भाजपला रोखण्यासाठी समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आरएलडीसह एकूण 10 पक्षांशी युती केली होती, परंतु त्यांचा हा प्रयोग अयशस्वी ठरताना दिसत आहे. सध्या अखिलेश यांची युती केवळ 118 जागांवर आघाडीवर आहे. पश्चिम यूपी पट्टा, जिथे पक्षाला सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा होती, तिथेही अपेक्षित यश दिसत नाही.

दुसरीकडे भाजप पुन्हा एकदा प्रचंड बहुमतासह स्वबळावर सरकार स्थापन करताना दिसत आहे. सरकार स्थापन करण्यासाठी 202 जागांची गरज आहे, मात्र पक्षाने 274 जागांवर आघाडी घेतलीय. अशा प्रकारे पक्ष बहुमताच्या जवळ जाताना दिसत आहे. यूपीमध्ये सलग दुसऱ्यांदा कोणताही पक्ष सत्तेवर येण्याची ही पहिलीच वेळ असेल.

- Advertisement -

हेही वाचाः UP Election Result 2022 : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा क्लीन स्विप, ४० हजार मतांनी

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -