घरAssembly Battle 2022UP Election Result 2022 : शिवसेनेला यूपीतल्या लोकांनी साफ नाकारलं, उमेदवारांचे डिपॉझिट...

UP Election Result 2022 : शिवसेनेला यूपीतल्या लोकांनी साफ नाकारलं, उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार?

Subscribe

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये शिवसेनेने भाजपला चांगलेच आव्हान दिले होते. परंतु शिवसेनेचा सुपडा साफ होताना दिसत आहे. मतमोजणी सुरु झाल्यानंतर भाजपने आघाडी पकडली ती कायम ठेवली आहे. परंतु सुरुवातीच्या तीन तासांमध्ये शिवसेनेचे साधं खातंही उघडलं नव्हते. काही ठिकाणी तर शिवसेनेला नोटापेक्षा कमी मत मिळाली आहेत. उत्तर प्रदेशच्या जनतेनं महाराष्ट्रातील शिवसेनेला नाकारलं आहे. काही उमेदवारांवर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढावली आहे. यापूर्वीसुद्धा शिवेसेनेने २०१७ मध्ये निवडणूक लढवली होती त्यावेळीसुद्धा यश मिळाले नव्हते.

उत्तर प्रदेश निवडणूकीमध्ये शिवसेनेने ४०३ जागांपैकी ५२ जागांवर आपला उमेदवार दिला होता. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना आहे. महाराष्ट्रात भाजपशी संघर्ष सुरु असताना शिवसेनेने भाजपला उत्तर प्रदेशमध्येसुद्धा आव्हान दिले होते. युवासेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत, मंत्री एकनाथ शिंदे असे महाराष्ट्रातील वजनदार नेते उत्तर प्रदेशमध्ये प्रचारासाठी गेले होते. परंतु शिवसेनेला साफ नाकारलं आहे.

- Advertisement -

शिवसेना पक्ष प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र मंत्री आदित्य ठाकरे यांचा उत्तर प्रदेशमधला रोड शो फ्लॉप गेला आहे. शिवसेना स्वतंत्र लढत होती. काही उमेदवारांचे आता डिपॉझिट जप्त होण्याची परिस्थिती आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत उत्तर प्रदेशमध्ये अनेक दिवस तळ ठोकून होते.

पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये खतौली, मेरठ कैंट, धौलाना, नोएडा, दादरी, सिकंदराबाद, अनूपशहर, डिबाई, मांट, मथुरा, खैरागढ आणि दक्षिण आगरा येथे उमेदवार दिले होते परंतु एकाही उमेदवाराचा करिष्मा चालला नाही. उत्तर प्रदेशमध्ये नोटाला ०.७१ टक्के मतदान आहे तर शिवसेनेला ०.०२ टक्के मतदान झाले आहे.

- Advertisement -

शिवसेना गोव्यात अपयशी

शिवसेना राष्ट्रीय पातळीवर पक्ष विस्तार करत आहे. यानुसार शिवसेनेने गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय़ घेतला होता. गोव्यात शिवसेनेने १० उमेदवार दिले होते. परंतु एकाही उमेदवाराल विजय मिळवता आला नाही. मतमोजणी सुरु झाल्यावर शिवसेना पिछाडीवर होती. काही ठिकाणी नोटापेक्षा कमी मतदान झाले आहे. शिवसेनेला गोव्यात ०.२५ टक्के मतदान होते तर नोटाला १.२० टक्के मतदान होते.


हेही वाचा : UP Election Result 2022 : प्रियंका गांधींना यूपीत नाकारलं, काँग्रेसचे ‘महिला कार्ड फेल’

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -