UP Elections 2022: काँग्रेस बुडवण्यासाठी कोणा दुसऱ्याची गरज नाही, राहुल-प्रियांका गांधी पुरेसे – मुख्यमंत्री योगी

UP Elections 2022 Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath target to congress leader rahul gandhi and priyanka gandhi
UP Elections 2022: काँग्रेस बुडवण्यासाठी कोणा दुसऱ्याची गरज नाही, राहुल-प्रियांका गांधी पुरेसे - मुख्यमंत्री योगी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी (Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath) काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधींबाबत (Rahul Gandhi and Priyanka Gandhi) असे काही वक्तव्य केले आहे, ज्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत देताना मुख्यमंत्री योगी यांनी आपल्या सरकारची पाठ थोपडून काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. यादरम्यान भावा-बहिणीच्या जोडीवर ताशेरे उडवले आहेत.

काँग्रेससंबंधित विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, ‘काँग्रेसला बुडवण्यासाठी कोणा इतराची गरज नाही, हे भाऊ-बहीण पुरेसे आहेत. उत्तर प्रदेशमध्ये जिंकण्यासाठी शांततेने निवडणूक होत आहे, असे यापूर्वी कधीच झाले नाही. आमच्या सरकारमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष दिले जाते. पण राज्याचा विकास विरोक्षी पक्षाला पाहावत नाही आहे, त्यामुळे ते निरर्थक विधाने करत आहेत.’

उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मिळणार बहुमत

पुढे मुख्यमंत्री योगी म्हणाले की, ‘आम्ही जे म्हटले होते, ते करून दाखवणार आहे. डबल इंजिनच्या सरकारने लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. पहिल्या टप्प्यानंतर परिस्थिती स्पष्ट आहे की, भाजप उत्तर प्रदेशात प्रचंड बहुमताचे सरकार होईल. आमच्यासोबत ८० टक्के लोकं आहेत.’

दरम्यान त्यांना सपाचे नेते अखिलेश यादव म्हणाले होते की, भाजप थंड पडले आहे. या प्रश्नाचे उत्तर देताना योगी म्हणाले की, जनतेने त्यांना थंड पाडले आहे. आम्ही लोकं जे पहिले होतो, ते आज आहोत.


हेही वाचा – UP Elections 2022: सहारनपूरमध्ये मतदारांची थर्मल स्क्रीनिंग; कोरोनाबाधित आढळल्यास संध्याकाळी ५ नंतर करू शकणार मतदान