घरदेश-विदेशराम जन्मभूमि कॉरिडॉर : अयोध्येतील रस्त्यांसाठी 107 कोटींचा निधी योगी सरकारकडून मंजूर

राम जन्मभूमि कॉरिडॉर : अयोध्येतील रस्त्यांसाठी 107 कोटींचा निधी योगी सरकारकडून मंजूर

Subscribe

रामनगरी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचे 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबरपर्यंत धावपट्टी बांधली जाईल

रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येतील रस्ते रुंद, सुंदर आणि सोयीस्कर बनवण्यासाठी योगी सरकारने 107 कोटी रुपयांचा पहिल्या टप्प्यातील निधी मंजूर केला आहे. या रस्ते योजनेसाठी एकूण 9 अब्ज रुपयांचे बजेट ठेवण्यात आले आहे. योगी सरकारने श्री रामजन्मभूमीच्या आजूबाजूच्या परिसराला दिव्य रुप देण्याची योजना आखली आहे. ज्याला श्रीकाशी विश्ननाथ धामच्या विकसित करण्यात येत असलेल्या श्री रामजन्मभूमी कॉरिडॉर असे नाव देण्यात आले आहे, हे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्या आहेत. तसेच या प्रकल्पावर जिल्हा दंडाधिकारी देखरेख ठेवणार आहेत.

अयोध्येत राम मंदिर उभारणीसोबतच भाविकांसाठी सुविधा विकसित करण्याचे काम वेगाने सुरु आहे. राम मंदिराकडे जाणारे तीन मार्ग राजपथ, जन्मभूमी आणि भक्ती मार्ग म्हणून तयार केले जात आहेत. यात सहदतगंज- नायघाट रस्त्याला रामपथ, सुग्रीव गडापासून रामजन्मभूमी मार्गाला जन्मभूमी आणि शृंगारहाटपासून ते श्री रामजन्मभूमी मार्गाला भक्ती मार्ग असे नाव देण्यात आले आहे.

- Advertisement -

रामलल्लांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे डीएम नितीश कुमार यांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत आता भाविकांसाठी सार्वजनिक सुविधा विकसित करण्याची गरज लक्षात घेत सर्वप्रथम राम मंदिराच्या या तीन प्रवेश रस्त्यांचा विकास केला जाणार आहे.

रामनगरी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचे 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबरपर्यंत धावपट्टी बांधली जाईल. त्याचबरोबर फेज-2 आणि फेज-3 साठी 99 टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. आता लवकरच विमानतळाच्या दुसऱ्या टप्प्याचे कामही सुरू होण्याची शक्यता आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या देखरेखीखाली हे बांधकाम सुरू आहे.


आदित्य ठाकरेंच्या ‘मतदारांची हंडी’ फोडण्यासाठी आशिष शेलारांचे वरळीत थर

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -